जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सोयाबीन पीक कापणी प्रयोग - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, October 8, 2026

जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सोयाबीन पीक कापणी प्रयोग


 

अमरावती, दि. ८ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : कृषी, महसूल व जिल्हा परिषद विभागामार्फत राज्यातील प्रमुख पिकांच्या उत्पादनाचा अंदाज आणि आढावा घेण्यासाठी पीक कापणी प्रयोगांचे आयोजन केले जाते. आज तळखंडा, ता. अमरावती येथे जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या उपस्थितीत सोयाबीन पीक कापणी प्रयोग करण्यात आला.


तळखंडा येथे काल शेतकरी प्रवीण ढोरे यांच्या शेतात सोयाबीन पीक कापणी प्रयोग पार पडला. यामध्ये पीक कापणी प्रयोगाच्या प्लॉटमधून ३.१३० किलो म्हणजेच प्रतिहेक्टरी ६.२६ क्विंटल सोयाबीनचे उत्पन्न मिळाले. या प्रयोगांतून प्राप्त होणाऱ्या आकडेवारीचा उपयोग सरासरी उत्पन्न, पैसेवारी आणि पीक विमा योजना ठरवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.


 

अमरावती तालुक्यात सोयाबीनच्या नियोजित १२६ पीक कापणी प्रयोगांपैकी ५१ प्रयोग पूर्ण झाले आहे. उर्वरित प्रयोग मार्गदर्शक सूचनेनुसार वेळेत पूर्ण केले जाणार आहे, अशी माहिती कृषी विभागाने दिली.


यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते, उपविभागीय अधिकारी अनिल भटकर, पंकज चेडे, तहसीलदार विजय लोखंडे, तालुका कृषी अधिकारी प्रशांत गुल्हाने, गट विकास अधिकारी, कृषी व महसूल विभागाचे क्षेत्रिय कर्मचारी, ग्रामस्तरीय समिती सदस्य, इफ्को टोकियो विमा कंपनीचे प्रतिनिधी आणि स्थानिक शेतकरी उपस्थित होते.

 

अचूक व पारदर्शक प्रयोगांचे निर्देश पीक कापणीच्या वेळी जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थितांकडून पिकांची सद्यस्थिती, उत्पादनाचा अंदाज आणि शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच, पीक कापणी प्रयोग अत्यंत अचूक आणि पारदर्शक पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages