अखिल बारी समाज सर्व शाखीय महासंघाची केंद्रीय कार्यकारणी सभा संपन्न. - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Saturday, October 3, 2026

अखिल बारी समाज सर्व शाखीय महासंघाची केंद्रीय कार्यकारणी सभा संपन्न.

 



अमरावती दिनांक ३

 सौ हर्षा पाटील 

( ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क)

     देश पातळीवर उभारण्यात आलेल्या अखिल बारी समाज सर्व शाखीय महासंघाची केंद्रीय कार्यकारणी सभा राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती दिनी २ ऑक्टोबरला टोंगसे पाटील बिल्डकॉन सोल्युशन प्रा. लि.चे सभागृहात अमरावती येथे संपन्न झाली आहे.

सभेच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सभापती मनोहर सुने होते. त्यामध्ये राष्ट्रीय कार्यकारणी घोषित करण्यात आली आहे. 

राष्ट्रीय अध्यक्ष-मनोहर सुने ,राष्ट्रीय समन्वयक- श्रीकृष्णराव टोंगसे., राष्ट्रीय समन्वयक -डॉ. अरविंद  कुऱ्हाडे, राष्ट्रीय उपाध्यक्ष- ॲड. कमलकांत लाडोळे, राष्ट्रीय उपाध्यक्ष -सौ. सुरेखा दामेधर, राष्ट्रीय संघटक - अरुण आकोटकर,  राष्ट्रीय सरचिटणीस -संदीप सुने, राष्ट्रीय कोषाध्यक्ष-प्रभाकर ताडे, राष्ट्रीय चिटणीस-सौ. सुनिता गुर्जर, राष्ट्रीय प्रसिद्धीप्रमुख -सुधाकर टिपरे, राष्ट्रीय विधी सल्लागार -सौ किरण भुते, राष्ट्रीय महिला संघटिका- सौ. नीलिमा निमकर, राष्ट्रीय सदस्य-विलास दामेधर ,योगेश भोज, प्रवीण येऊल, नितीन टींगणे ,हर्षा आकोटकर, वर्षा दातीर यांची निवड करण्यात आली आहे. 

समाजाच्या सर्वांगीण विकासाकरता स्थापन करण्यात  आलेला महासंघ राष्ट्रसंत श्री रूपलाल महाराज यांचे स्मारक अंजनगाव सुर्जी येथे व समाजाचे महामंडळ कार्यरत करण्याकरिता प्रयत्न करणार आहे. समाजाच्या सर्व विभागातील अस्तित्वात असलेल्या संस्था सलग्नित करण्याबाबत ही प्रयत्न करणार आहे ‌.



*सौ. चैताली तुषार दुधे अमरावती जिल्हा महिला अध्यक्षपदी नियुक्ती*करण्यात आलेली आहे. 

बारी समाजाचे शासकीय व निमशासकीय राज्य आघाडी करिता प्रमोद कुऱ्हाडे व नंदकुमार पोकळे यांना राज्य पदाधिकारी नियुक्त करून त्यांच्याकडे  राज्य आघाडी स्थापना जबाबदारी देण्यात आली आहे.

सभेला तुषार दुधे, वैभव दाभाडे , हर्षा पाटील सह बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते.

समाजाचे जिल्हा, तालुका व गाव निहायसंघटन करिता  जबाबदारी देण्यात आलेली आहे.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages