दिनांक: २४ सप्टेंबर२०२६
अमरावती, दि.२४: महाराष्ट्र राज्याने महिला सक्षमीकरण करण्याच्या दृष्टीने 'महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम २०२६' लागू केला आहे. त्याअंतर्गत पात्र महिलांना शेतकरी प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार असुन त्याद्वारे त्यांना अधिकृतपणे महिला शेतकरी म्हणून मान्यता मिळेल, तसेच शासनाच्या विविध कृषि योजना, कर्ज, विमा, अनुदाने, प्रशिक्षणे, तांत्रिक मार्गदर्शनाचा लाभ सुलभपणे मिळू शकेल.
शेतीमध्ये काम करणाऱ्या महिला, दुग्धव्यवसाय, शेळीपालन, कुक्कुटपालन, रेशीम उद्योग, मधुमक्षिकापालन, भाजीपाला फळबाग लागवड व इतर शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्या महिलांना लाभ घेता येईल. अशा पात्र महिलांनी त्वरीत महिला शेतकरी पोर्टलवर https://uat-mahakrishi.