अमरावती, दि.3 (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : लेखा व कोषागारे संचालनालयाने निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांसाठी महा-उपलब्धी या मोबाईल ॲपबाबत जनजागृती व मार्गदर्शन करण्यासाठी अमरावती जिल्हा कोषागार कार्यालयात विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही कार्यशाळा मंगळवार, दि. 6 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा कोषागार कार्यालयातील जिजाऊ सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.
‘महा-उपलब्धी’ॲपच्या माध्यमातून निवृत्तीवेतनासंबंधी विविध सेवा जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने उपलब्ध होणार आहेत. निवृत्तीवेतनधारकांना विविध सेवांचा लाभ घेण्यासाठी हे ॲप उपयुक्त ठरणार आहे. वित्त विभागाचे प्रधान सचिव (ले. व को.) ऑनलाइन उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
कोषागार कार्यालयांतर्गत येणाऱ्या सर्व निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी उपस्थित राहून कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोषागार अधिकारी (निवे.) अमोल इखे यांनी केले आहे.