शिरसगावात विद्युत वितरण कंपनीचा नागरिकांच्या जीवाशी खेळ - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, January 1, 2026

शिरसगावात विद्युत वितरण कंपनीचा नागरिकांच्या जीवाशी खेळ

 


 शिरजगाव कसब्यात महावितरणचा नागरिकांच्या जीवाशी खेळ; प्रशासकीय दिरंगाईमुळे संताप

शिरजगाव कसबा दिनांक २(सौ.विद्या दाभाडे)

शिरजगाव व परिसरामध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचा विद्युत ग्राहका चे जीवाशी खेळ सुरू असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.  

 शिरजगाव कसबा परिसरात महावितरणच्या (MSEDCL) भोंगळ कारभारामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला आहे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या तांत्रिक समस्यांकडे स्थानिक प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असून, यामुळे एखादी मोठी जीवितहानी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

     गावामध्ये गुरुदेव नगर, आठवडी बाजार, पेठ पुरा व शीतला माता मंदिर परिसरामध्ये विद्युत वितरण कंपनीच्या तारा नागरिकांच्या घरावरून गेलेल्या आहे. याबाबत अनेकदा अपघात घडले असून मजुरी करणाऱ्या नागरिकांचे घरही जळाले होते. आठवडी बाजार परिसरामध्ये असलेले विद्युत रोहित्र उघड्यावर आहे. दर शनिवारी येथे मोठा आठवडी बाजार भरत असून बाजारामध्ये येणाऱ्या नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.  देऊरवाडा येथे अनेक घरांचे भिंतीला लागून तारा गेलेल्या आहे. विद्युत रोहित्र कपाटबंद असावे. घरावरून व घराचे बाजूने गेलेल्या विद्युत तारा चे ठिकाणी विद्युत केबल टाकण्यात यावे. अशी मागणी नागरिकांनी २०२१ पासून विद्युत वितरण कंपनीचे कार्यालयाला केली असता फक्त निधी नसल्याने आम्ही काम करू शकत नाही असे अधिकारी सांगत आहे. तोपर्यंत विद्युत ग्राहक नागरिकांचे जीवाशी खेळ सुरूच राहणार असे दिसत आहे.

प्रमुख समस्या:
लोंबकळणाऱ्या वीज तारा: गावातील अनेक गल्ल्यांमध्ये आणि शेतशिवारात विजेच्या उच्च दाबाच्या तारा (High-Voltage Lines) जमिनीपासून अवघ्या काही फुटांवर लोंबकळत आहेत. यामुळे पादचारी आणि शेतकऱ्यांना शॉक लागण्याचा धोका वाढला आहे. 
गंजलेले विद्युत खांब: अनेक ठिकाणी विजेचे खांब गंजून धोकादायक अवस्थेत उभे आहेत. पावसाळ्यात किंवा वादळात हे खांब कोसळून मोठी दुर्घटना घडू शकते.
उघड्या डीपी (DP): गावातील महत्त्वाच्या चौकांमध्ये असणाऱ्या ट्रान्सफॉर्मर (DP) च्या पेट्या उघड्या असून, त्याभोवती सुरक्षेसाठी कोणतेही कुंपण नाही. यामुळे लहान मुले आणि पाळीव प्राण्यांच्या जीवाला धोका आहे.

प्रतिक्रिया_

* " महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी  कार्यालय अंतर्गत रोहित्र बसविणे, विद्युत लाईन बदलवीने व नवीन  केबल टाकणे चे कामे जिल्हा नियोजन मंडळ (डीपीसी)अंतर्गत केली जात असते. यामधून फार कमी प्रमाणात विद्युत कंपनीला निधी दिला जात आहे.खासदार व आमदार यांनी सुचवलेली कामे प्रथम प्राधान्य ने केली जात आहे. 

नागरिकांचा आरोप:
शिरजगाव कसब्यातील नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही महावितरणच्या स्थानिक कार्यालयाकडून केवळ आश्वासन दिले जात आहे. "आम्ही वीज बिल वेळेवर भरतो, मग सुरक्षित सेवा का मिळत नाही?" असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. जर तातडीने दुरुस्ती झाली नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक रहिवाशांनी दिला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून (अमरावती) सार्वजनिक सेवांमधील सुधारणांसाठी प्रयत्न केले जात असताना,  शिरजगाव कसब्यातील या परिस्थितीकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. 

निलेश बोरीकर 

 विभागीय अभियंता 

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी अचलपूर


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages