दुष्काळग्रस्त भागातील दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Saturday, October 3, 2026

दुष्काळग्रस्त भागातील दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ

  •  
    दि.३ :-
    राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार, राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळजन्य परिस्थिती घोषित करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांवर आर्थिक ताण पडू नये म्हणून विशेष उपाययोजनांतर्गत परीक्षा शुल्क माफीचा निर्णय घेण्यात आला.
     
  •  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या दहावी (SSC) आणि बारावी (HSC) च्या बोर्ड परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांना ही सवलत लागू असेल. 
  • राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी सर्व विभागीय मंडळांना पत्र पाठवून तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. दुष्काळग्रस्त भागातील शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून पुढील आदेश येईपर्यंत कोणतेही परीक्षा शुल्क न घेता त्यांचे ऑनलाईन आवेदनपत्र (परीक्षा अर्ज) भरून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.  या निर्णयाची सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये त्वरित अंमलबजावणी करून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल राज्य मंडळाकडे तात्काळ सादर करण्यास सांगण्यात आले आहे.
  • या निर्णयामुळे ग्रामीण आणि दुष्काळग्रस्त भागातील आर्थिक अडचणीत असलेल्या हजारो कुटुंबांना आणि विद्यार्थ्यांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे. 

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages