सुभाष बेहरे यांचे पाळा शेतशिवारामध्ये विद्युत तारांच्या घर्षणाने 101 संत्रा झाडे जळाली आहे.





 शिरजगाव कसबा: विद्युत तारांच्या घर्षणाने लागलेल्या आगीत १०१  संत्रा झाडे भस्मसात; शेतकऱ्याचे मोठे नुकसान

दिनांक 5,डींगाबर सुने शिरजगाव कसबा (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क):
येथील पाळा शेतशिवार भागात शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत शेतकरी सुभाष बेहरे यांच्या मालकीची सुमारे १०१  फळभारावर आलेली संत्रा झाडे जळून खाक झाली आहेत. या घटनेमुळे शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुभाष बेहरे यांचे पाळा शिवारात शेत आहे. उन्हाळ्याचा दिवस असल्याने शेतात पालापाचोळा आणि वाळलेले गवत मोठ्या प्रमाणावर होते.दि. ३ मे ला दुपारच्या सुमारास  अतिउष्ण हवामानामुळे आणि वाऱ्यामुळे सुभाष बेहरे यांच्या  शेतातून गेलेल्या विद्युत तारांचे एकमेकांशी घर्षण झाले. या घर्षणामुळे ठिणग्या पडून शेताला आग लागली.
उन्हाचा कडाका आणि वाऱ्याचा वेग जास्त असल्याने आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केले. या आगीमध्ये शेतातील ठिंबक सिंचनाचे संचही जळाले आहे.ही आग वेगाने संत्र्याच्या बागेत पसरली. शेतकऱ्याने आणि आजूबाजूच्या शेतकरी बांधवांनी आग विझवण्याचा शर्थीने प्रयत्न केला, परंतु आगीची तीव्रता इतकी होती की पाहता पाहता फळांनी लगडलेली १०१ मोठी झाडे पूर्णपणे होरपळून निघाली. झाडांसोबतच शेतातील ठिबक सिंचनाचे संचही आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहेत.
नुकसानीचा पंचनामा करण्याची मागणी:
सुभाष बेहरे यांनी वर्षभर मेहनत करून ही संत्रा बाग जोपासली होती. या आगीत केवळ झाडेच जळाली नाहीत, तर ठिबक सिंचन संच आणि इतर साहित्यही जळून खाक झाले आहे. महावितरणच्या (MSEB) जुनाट आणि लोंबकळणाऱ्या तारांमुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केला आहे.
नुकसानभरपाई मिळावी यासाठी स्थानिक तलाठी, कृषी अधिकारी आणि महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या (MSEDCL) अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. तलाठ्यांनी या घटनेचा पंचनामा पूर्ण केला आहे.
शासनाने आणि महसूल विभागाने  नुकसानग्रस्त शेतकरी सुभाष बेहरे यांना आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी शिरजगाव कसबा परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
  नागरिकांचा संताप
विद्युत विभागाचे दुर्लक्ष: शिरजगाव कसबा गावात अनेक घरांवरूनही विद्युत तारा गेलेल्या आहेत. वादळी वाऱ्यामुळे या तारांचे घर्षण होऊन जीवितहानी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.विद्युत तारा व्यवस्थित टाकल्या न गेल्याने वादळ हवेमध्ये त्यांचे घर्षण होऊन अशा प्रकारे नुकसान होत आहे. याबाबत अनेकदा विद्युत वितरण कंपनीचे कार्यालयाला निवेदन दिलेले आहे. परंतु विद्युत वितरण कार्यालय कार्यालयाने अद्यापही दखल घेतलेली नाही त्यामुळे नागरिकांमध्ये विद्युत वितरण कंपनीच्या कार्यप्रणाली बाबत रोष व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments