शिरसगाव कसबा दिनांक ३ सौ.विद्या दाभाडे (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क ):
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित (महावितरण) अंतर्गत३३ के.व्ही. उपकेंद्र सर्फापूर (कॅम्प उपविभाग, अचलपूर) येथे कार्यरत असलेले वरिष्ठ यंत्रचालक दिनेश समाधानराव भटकर हे दिनांक २८ फेब्रुवारी २०२६ रोजी सेवेतून सेवानिवृत्त होत असल्याने त्यांच्या सन्मानार्थ शुक्रवार २८ फेब्रुवारी ला वितरण कंपनीचे उपकेंद्राचे प्रांगणात सेवानिवृत्ती समारंभ संपन्न झाला आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महावितरण उपविभाग कॅम्प अचलपूर येथील उपकार्यकारी अभियंता श्री. निलेश बोरकर होते. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून सहाय्यक अभियंता श्री. स्वप्नील हेटे ( सर्फापूर), श्री. सुमेध जंगम (करजगाव), श्री. हितेश ठाकूर (शिरजगाव), महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी संघटनेचे संयुक्त सचिव म. रा . स्वाभि वि.व. युनियन श्री. विनोद गोरले, अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. मनोहर सुने, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री. कैलास बापू देशमुख, सरपंच , सौ .धनश्री अखिल भटकर, अखिल पाटील भटकर व राजेंद्र भटकर तसेच विविध मान्यवर उपस्थित होते .
आपल्या भाषणात उपकार्यकारी अभियंता निलेश बोरकर यांनी श्री. भटकर यांच्या कार्याचे कौतुक केले. महावितरणमध्ये सेवा देताना त्यांनी दाखवलेली तत्परता आणि प्रामाणिकपणा नवीन कर्मचाऱ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले. उपस्थित इतर मान्यवरांनीही भटकर यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
हा निरोप समारंभ ३३ के.व्ही. उपकेंद्र महावितरण, सफापूर (करजगाव–शिरजगाव रोड) येथे शनिवार दि. २८ फेब्रुवारी रोजी दुपारी ४.३० वाजता आयोजित करण्यात आला असून कार्यक्रमानंतर प्रीतिभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे.
महावितरण सेवेत दीर्घकाळ प्रामाणिक व कर्तव्यदक्ष सेवा बजावलेल्या श्री. भटकर यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments