Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

शिरजगावात शेतकऱ्याची आत्महत्या

शिरजगाव कसबा  
दि. १८(दिगंबर सुने)
स्थानिक सायखेडा शेत शिवार जंगलमध्ये शांताराम तुकाराम वासनकर वय ६७ वर्ष या शेतकऱ्यांनी आंब्याच्या झाडाला जवळपास घेऊन आत्महत्या केली आहे.
दिनांक १७मे चे  रात्री उशिरापर्यंत घरी न आल्यामुळे नातेवाईकाकडून शोध घेतला असता सायंकाळी ९ वाजता
 सायखेडा शेत शिवारातील आंब्याच्या झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनात आले  आहे . अतुल शांताराम वासनकर   मुलाच्या पोलीस फिर्यादीवरून शिरसगाव कसबा पोलिसांनी घटना स्थळाचा पंचनामा करून उर्वरित तपासणी करिता शेतकऱ्याचा मृतदेह अचलपूर उपजिल्हा रुग्णालय येथे पाठवण्यात आला आहे. या घटनेची माहिती तहसील कार्यालयाला संबंधित गावातील तलाठी कार्यालयाकडून देण्यात आली असून मृतक शेतकऱ्याकडे स्वतःचे  १ एकर जमीन असून ८ एकर इतर शेतकऱ्यांची लागवड क्षेत्राखाली त्यांच्याकडे होती अशी माहिती समोर आली आहे.
५ वर्षापासून निसर्गाच्या  अवकृपेने सततची नापिकी व दोन दिवसापासून अवकाळी पावसाने होत असलेले कांद्याचे, उन्हाळी ज्वारीचे नुकसान होत आहे. कर्जाचा बोजा व नापिकी यामुळेच शेतकऱ्यांने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे.

Post a Comment

0 Comments