कडधान्य प्रक्रिया युनीट उभारणीसाठी 25 लाखांपर्यंत अनुदान - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, September 3, 2026

कडधान्य प्रक्रिया युनीट उभारणीसाठी 25 लाखांपर्यंत अनुदान

 लाभ घेण्याचे कृषी विभागाचे आवाहन



अमरावती, दि. ४ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : कडधान्य आत्मनिर्भर अभियानांतर्गत कडधान्य पिकांच्या मूल्यवर्धनास चालना देऊन उत्पन्न वाढविण्याच्या उद्देशाने काढणीनंतरची पायभूत सुविधा बळकट करण्यासाठी कडधान्य प्रक्रिया युनीट उभारण्याकरिता २५ लाखांपर्यंत अनुदान देण्यात येते. या योजनेंतर्गत शेतकरी उत्पादक संस्था (एफपीओ) ,क्लस्टर स्तर महासंघ (सीएलएफ), प्राथमिक कृषी पतसंस्था (पीएसीएस) तसेच इच्छुक व्यक्ती व संस्थांना प्रक्रिया युनीट  उभारण्यासाठी अनुदान लाभ घेण्याचे आवाहन,  जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी केले आहे. या लाभासाठी अनुसूचित जाती व जमाती,महिला,डोंगराळ क्षेत्रांना प्राधान्य  देण्यात येणार आहे.

 

 

            या योजनेच्या लाभासाठी  एफपीओ , सीएलएफ, पीएसीएस हे किमान मागील दोन वर्षांपासून नोंदणीकृत व कार्यरत असणे गरजेचे आहे.तसेच प्रकल्प खर्चाच्या किमान १५ टक्के रक्कम व कार्यभांडवलासाठी मार्जीन मनी स्वत: उभारण्याची क्षमता असावी. वैयक्तीक लाभार्थ्यांसाठी अर्जदाराचे किमान वय २१ वर्षे असणे आवश्यक असून एका कुटुंबातील एका व्यक्तीलाचा हा लाभ अनुज्ञेय असणार आहे. तसेच प्रकल्प खर्चाच्या किमान १५ टक्के रक्कम व कार्यभांडवलासाठी मार्जीन मनी स्वत: उभारण्याची त्या व्यक्तीची क्षमता असावी.

 

 

प्रक्रिया युनीट उभारणीकरिता प्रकल्प खर्चाच्या ३३ टक्के  किंवा कमाल २५  लाख  प्रति युनीट अनुदान हे केवळ यंत्रसामग्री खरेदी  तसेच इमारत,गोदाम,साठवण पायाभूत सुविधांच्या बांधकामासाठी अनुदानाच्या जास्तीत जास्त हिस्सा एकूण पात्र अनुदानाच्या ३० टक्के पर्यंत राहणार आहे. अनुज्ञेय राहणार आहे.

 

 

            नवीन प्रक्रिया युनीटची किमान क्षमता ३०० कि.ग्रॅ.असावी. खरेदी करण्यात येणारी यंत्रसामुग्री भारतीय मानक ब्युरो किंवा सक्षम गुणवत्ता मानकाचे पालन करणारी असावी. लाभार्थीने युनीट उभारणीच्या दिनांकापासून किमान ३ वर्षे सदर मालमत्ता जतन करणे बंधनकाराक राहील. अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे संपर्क साधता येणार आहे.                 

                                                                  

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages