अष्टविनायक गणेशोत्सव मंडळ, होम मिनिस्टर कार्यक्रमात सौ. किरण भुते प्रथम बक्षीसाचे मानकरी - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Wednesday, September 30, 2026

अष्टविनायक गणेशोत्सव मंडळ, होम मिनिस्टर कार्यक्रमात सौ. किरण भुते प्रथम बक्षीसाचे मानकरी

 



अमरावती.  दिनांक १ 

(सौ. हर्षा पाटील)

  जवाहरनगर अमरावती येथे अष्टविनायक गणेशोत्सव मंडळात होम मिनिस्टर ,खेळ रंगला पैठणीचा  उत्स्फूर्त कार्यक्रम संपन्न झालेला आहे. 

     या कार्यक्रमात श्रीमती यशोमती ठाकूर माजी पालकमंत्री अमरावती यांचे हस्ते प्रथम बक्षीस सौ. किरण अमोलराव भुते अमरावती यांना देण्यात येऊन सत्कार करण्यात आलेला आहे. याच कार्यक्रमा मध्ये सौ. प्रणिता बलींगे , सौ. कविता वाकोडे , सौ.ममता तातोड यांना हे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. तसेच या मंडळात निंबू चमचा , संगीत खुर्ची , सामान्य ज्ञान, चित्रकला, व मटका फोड स्पर्धा   व विविध कार्यक्रम संपन्न झाले आहे.

      या कार्यक्रमांमध्ये सौ. नवनीत राणा माजी खासदार यांची विशेष उपस्थिती होती तर प्रमुख उपस्थितीमध्ये  ऋषिकेश देशमुख नगरसेवक मनपा अमरावती, सौ.सुषमा ताई काळे मा.नगरसेविका ,सौ. सुषमाताई बर्वे मा‌.नगरसेविका ,सौ.योगीनिताई बोंडे, श्री. प्रभुदास फंदे यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाला जवाहर नगरातील महिला ,पुरुष व युवकांची विशेष उपस्थिती होती.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages