राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत तेल काढणी युनीट करिता अर्ज करण्याचे आवाहन - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, September 3, 2026

राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत तेल काढणी युनीट करिता अर्ज करण्याचे आवाहन


 


 

अमरावती, दि. ४ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : राष्ट्रीय  खाद्यतेल अभियान-तेलबिया सन २०२६-२७ अंतर्गत काढणी पश्चात पायाभूत सुविधा घटकांतर्गत तेल काढणी युनीट करिता शेतकरी, शासकीय किंवा खाजगी उद्योग, शेतकरी उत्पादक संस्था (एफपीओ),सहकारी संस्था, तेलावर प्रक्रिया करणाऱ्या नोंदणीकृत नवीन कंपनी तसेच या योजनेंतर्गत निवडलेले मुल्यसाखळी भागीदार यांना येत्या ३१ सप्टेंबर २०२६ पर्यंत  अर्ज करण्याचे आवाहन, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी केले आहे.

 

            या राष्ट्रीय अभियानांतर्गत बियाणे संकलन आणि तेल काढण्याची कार्यक्षमता वाढविण्यासाठी १० टन क्षमतेचे तेल काढणी युनीट आणि तेलबियांवर प्रक्रिया करण्यासाठी यंत्रसामग्री व उपकरणे तसेच तेलबिया प्रक्रिया युनीट करिता प्रकल्प खर्चाच्या ३३ टक्के कमाल  किंवा ९ लाख ९० हजार रूपये यापैकी जे कमी असेल त्याप्रमाणे अनुदान अनुज्ञेय राहणार आहे.

 

काढणी युनीट करिता खरेदी करण्यात येणारी यंत्रसामुग्री भारतीय मानक ब्युरो किंवा सक्षम गुणवत्ता मानकाचे पालन करणारी असावी तसेच याकरिता इच्छूक भागदाराने बँकेकडे कर्ज मंजुरी करिता प्रकल्प सादर करावा लागणार आहे.बँकेने कर्ज मंजूर केल्यानंतर अर्जदार या योजनेच्या लाभास पात्र राहणार असून ३१ सप्टेंबर २०२६ पर्यंत त्यांना संबंधित तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे अर्ज करता येणार आहे. अधिक माहितीसाठी गावातील सहायक कृषी अधिकारी,उपकृषी अधिकारी व मंडळ कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधता येणार आहे.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages