युवा पिढीला एआय बेस तंत्रज्ञानाद्वारे पुढे नेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार - महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Saturday, August 22, 2026

युवा पिढीला एआय बेस तंत्रज्ञानाद्वारे पुढे नेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार - महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

 

 

‘अमरावती युवा महोत्सव 2026’चे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते उद्घाटन

मेळघाट महोत्सवाच्या माध्यमातून युवकांना संधी



 

अमरावती, दि. २२ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) :युवा पिढीला कृत्रिम बुद्धीमत्ता आधारीत तंत्रज्ञानाचा उपयोग करून विविध कौशल्य आत्मसात करता यावे  तसेच  त्यांना गती असणाऱ्या क्षेत्रात पुढे घेवून जाण्यासाठी पालकमंत्री म्हणून सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे  प्रतिपादन, महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज येथे केले. मेळघाट महोत्सवात युवाकांना सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात कार्य करण्याची संधी उपलब्ध करून देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.


 

             नवराष्ट्र युथ फाऊंडेशनच्या वतीने येथील सायन्स कोर मैदानावर आयोजित तीन दिवशीय ‘अमरावती युवा महोत्सवा’चे आज उद्घाटन पालकमंत्री  श्री. बावनकुळे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. आमदार प्रवीण पोटे आणि प्रवीण तायडे, नवराष्ट्र युथ फाऊंडेशनचे अध्यक्ष हिमांशु पाटील, ह.भ.प. प्रशांत महाराज ठाकरे आदी यावेळी उपस्थित होते.


 

          पालकमंत्री श्री. बावनकुळे म्हणाले, युवा महोत्सवाच्या माध्यमातून  जिल्ह्यातील युवक-युवतींची प्रतिभा, सर्जनशिलता आणि सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडणार आहे. अमरावती व विदर्भाच्या मातीचे संस्कार त्यांच्या सादरीकरणातून दिसून येतील. यासोबतच ज्ञान, तंत्रज्ञान व कल्पकतेच्या माध्यमातून आधुनिक भारताच्या उभारणीतही हे युवा आपले योगदान देणार आहेत. राज्य शासनाने एआय बेस तंत्रज्ञानावर भर दिला असून युवकांना या क्षेत्रात पुढे जाण्याकरिता पोषक  वातावरण तयार करण्यात  येत आहे. अमरावती व राज्यातील युवकांनी यादृष्टीने पुढाकार घ्यावा त्यास राज्यशासन पूर्ण सहकार्य करेल असे सांगत एआयच्या सद्उपयोगावर भर देत दुरुपयोगापासून लांब रहावे असेही त्यांनी सांगितले. येत्या 25 डिसेंबर रोजी चिखलदरा येथे आयोजित करण्यात येणाऱ्या मेळघाट महोत्सवात युवाकांना सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात कार्यकरण्याची संधी उपलब्ध करून देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

 नवराष्ट्र युथ फाऊंडेशनचे अध्यक्ष हिमांशु पाटील यांनी प्रास्ताविक केले. 23 ऑगस्ट पर्यंत चालणाऱ्या या युवा महोत्सवामध्ये दररोज सकाळी 10 ते सायंकाळी 6.30 दरम्यान शिक्षणतज्ञांचे व्याख्यान, युथ पार्लमेंट, गरबा नाईट, स्टार्टअप एक्सगो स्पर्धा, अमरावती गॉट टॅलेंट आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.


  

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages