पालकमंत्र्यांनी दाखविली नवीन वाहनांना हिरवी झेंडी - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Saturday, August 22, 2026

पालकमंत्र्यांनी दाखविली नवीन वाहनांना हिरवी झेंडी


 

अमरावती, दि २२ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : जिल्हा प्रशासनाच्या वतीने खरेदी करण्यात आलेल्या तीन नविन वाहनांना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज हिरवी झेंडी दाखविली.



 

यावेळी आमदार प्रविण पोटे, प्रविण तायडे, महापौर श्रीचंद तेजवानी, विभागीय आयुक्त नयना गुंडे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी, पोलिस आयुक्त राकेश ओला आदी उपस्थित होते.

 

जिल्हाधिकारी कार्यालयाने अधिकाऱ्यांसाठी नवीन वाहने खरेदी केली आहेत. ही वाहने आज तहसिलदार आणि उपविभागीय अधिकारी यांना वितरीत करण्यात आली आहे. पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी विश्रामगृह येथे वाहनांना हिरवी झेंडी दाखविली. तसेच संबंधितांना वाहने सुपूर्द केली.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages