पोलीस प्रशासनाची अंतिम अधिसूचना जारी
अमरावती, दि. १८ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): शहरात वाढती लोकसंख्या, वाहनांची मोठी बर्दळ आणि त्यामुळे होणारे प्राणघातक अपघात रोखण्यासाठी अमरावती शहर पोलीस आयुक्तालयाने शहरातील प्रमुख मार्गावर हलक्या व जड मालवाहू वाहनांना प्रवेशबंदी घालण्यावाचलची अंतिम अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
पोलीस उपायुक्त (मुख्यालय) प्रांजली सोनवणे यांनी हे आदेश पारित केले आहेत, शहरात सन 2024 ते जुलै 2026 या काळात एकूण 1,108 अपघात झाले आहेत, यातील 212 प्राणघातक अपघातांमध्ये 246 निष्पाप नागरिकांचा बाळी गेला असून 913 व्यक्ती गंभीर व किरकोळ जखमी झाल्या आहेत. हो गंभीर परिस्थिती लक्षात घेता सर्वसामान्य नागरिक व विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रसिद्धी पत्रात सांगण्यात आले आहे.
दररोज सकाळी 6.30 ते रात्री 9.30 वाजेपर्यंत वाहनांना शहरात प्रतिबंध असणार असून या वाहनांमध्ये मालविरहित (खाली गाडी) बजन 2,000) किग्रॅ (2 टन) पेक्षा जास्त असणारी सर्व हलको य जड व्यावसायिक वाहने, ज्या वाहनांची भारसहित बहन क्षमता 2 टनांपेक्षा जास्त आहे अशी सर्व चाहने, सर्व प्रकारच्या अति अवजड (मल्टी-अॅक्सल) बाहनांचा समावेश आहे.
यावेळेत शहरातील जे मार्ग बंद राहतील यामध्ये मुख्य चौक व बायपास मार्ग गोरी इन बा पॉइंट, वेलकम टी पॉइंट, पंचवटी, इविन चौक, जयस्तंभ चौक, राजकमल चौक, गद्रे चोक, नवाथे चोक, बेनाम चोक, अलमास गेट, बडनेरा ते यवतमाळ वाथ पॉइंट यांचा समावेश असेल. तसेच नाका व अंतर्गत मार्गामध्ये राजुरा नाका, विद्यापीठ चौक, वियागी चौक, जिल्हाधिकारी कार्यालय, इविन चौक, दीपक चौक, चित्रा चौक, टांगा पढ़ाव, नागपुरी गेट चौक ते ट्रान्सपोर्ट नगर व भातकुली जकात नाक्यापर्यंत या मार्गाचा समावेश आहे.
इतर महत्त्वाच्या मार्गामध्ये आर.टी.ओ. कार्यालय, शेगाव नाका, कठोरा नाका, पोते पाटील चोक, रहाटगाव बस स्टॉप, विभागीय आयुक्त कार्यालय मार्ग तसेच एम. आय. डी. सी. परिसराचा समावेश आहे. कायमस्वरूपी बंद राहणान्या मागांमध्ये गांधी चौक ते रबिनगर, गांधी चौक ते राजापेठ आणि गांधी चौक ते अंबापेठ मार्ग, तसेच बजरंग टेकडो ते विलासनगर, पटवा घोक, मोरबाग, मसानगंज, गर्ल्स हायस्कूल चौक ते इर्विन चौक, शहरातील परकोटाच्या आतील दाट लोकवस्तीतील सर्व अंतर्गत मार्गाचा समावेश आहे.
अत्यावश्यक सेवांना प्रवेशबंदीतून सूट देण्यात आली आहे. यात पेट्रोल, डिझेल, गॅस, शासकीय धान्य वितरण वाहने, महापालिका कचरा संकलन, अतिक्रमण विभाग, पोलीस, रुग्णवाहिका व अग्निशमन दलाच्या वाहनांना प्रवेशबंदीतून पूर्ण सूट असेल. तसेच या वाहनांना ताशी 20 किमीची वेग मर्यादा पाळण्याचे बंधन घालण्यात आले आहे. अन्नधान्य व कृषी माल वाहतूकीला सूट देण्यात आली असून याअंतर्गत दररोज दुपारी 11.00 ते दुपारी 4.00 वाजेदरम्यान ठरवून दिलेल्या मार्गावरून जसे की रेल्वे मालचक्का बडनेरा, एमआयडीसी, कृषी उत्पन बाजार समिती या भागात वाहतुकीस परचानगी राहील.
गौण खनिज वाहतूकीसंदभांत काही सूचना देण्यात आल्या असून यानुसार दररोज सकाळी 8.30 ते दुपारी 12.30 वाजेपर्यंत तसेच सर्व रविवारी सकाळी 6.00 ते 11.00 आणि दुपारी 2.00 ते 4.00 या कालावधित विशिष्ट निर्धारित मार्गावरून वाहतुकीस सूट देण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाच्या वाहनांवर मोटर वाहन कायदा 1988 व महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 नुसार कठोर कारवाई केली जाईल असेही सांगण्यात आले आहे. यापूर्वी 10 ऑगस्ट 2026 रोजी अधिसूचना काढून नागरिकांकडून आक्षेप व सूचना मागविण्यात आल्या होत्या.