*रेणुका कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात!!* - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Tuesday, August 18, 2026

*रेणुका कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात!!*

अमरावती, दि. १८ ऑगस्ट : संत कबीर बहू.संस्था द्वारा संचालित रेणुका कॉलेज ऑफ नर्सिंग, बस स्टॅन्डजवळ, अमरावती येथे भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. शनिवार, दि. १५ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता आयोजित कार्यक्रमात मध्यवर्ती जिल्हा कारागृह, अमरावतीच्या अधीक्षक मा. कीर्ती चिंतामणी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.



कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संत कबीर बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्ष तथा रेणुका कॉलेज ऑफ नर्सिंगच्या संचालक अॅड. कविता मुळे होत्या.
यावेळी प्रमुख उपस्थितांमध्ये वसुंधरा शहर स्तर संघ (DAY-NULM), मनपा अमरावतीच्या अध्यक्ष सुजाता गणेश, सृजन मराठी साहित्य परिषद महाराष्ट्रचे जिल्हा समन्वयक संदीप देशमुख, जिल्हा अकोला, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हाकार्याध्यक्ष प्रफुल्ल मंदा श्रीधर तसेच संत कबीर संस्थेच्या सचिव देवयानी मुळे यांचा समावेश होता.
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य, संविधानिक मूल्ये, सामाजिक जबाबदारी आणि राष्ट्रनिर्मितीमध्ये युवकांची भूमिका याबाबत मार्गदर्शन केले. देशाच्या स्वातंत्र्याची जपणूक करताना प्रत्येक नागरिकाने संविधानिक मूल्यांचा आदर करून सामाजिक बांधिलकी जपणे आवश्यक असल्याचे यावेळी प्रतिपादन करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित सर्व प्रमुख मार्गदर्शकांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. मान्यवरांच्या सत्कारामुळे कार्यक्रमाला विशेष स्वरूप प्राप्त झाले.
या कार्यक्रमाला रेणुका कॉलेज ऑफ नर्सिंगचे विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वातंत्र्य दिनानिमित्त महाविद्यालय परिसरात उत्साहपूर्ण आणि देशभक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाग्यश्री राऊत मॅडम यांनी केले, तर नियाज भाई यांनी आभार मानले. राष्ट्रध्वजाला मानवंदना देत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.               


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages