मेघा नदीवरील संरक्षण भिंतीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Tuesday, August 11, 2026

मेघा नदीवरील संरक्षण भिंतीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

 

गावाला धोका

मेघा नदी, संरक्षण भिंत नादुरुस्त, गावाला धोका

 शिरजगाव कसबा दिनांक ११

अक्षय गुर्जर 

(ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) 

चांदूर बाजार तालुक्यातील शिरसगाव कसबा ला दि. २९ जून रोजी मेघा नदीला व लगतच्या वाझी नाल्याला आलेल्या पुरामुळे येथील नदीवरील संरक्षण भिंतीला मोठा तडा जाऊन काही भाग पूर्णपणे कोसळला आहे.

भिंतीवरील स्टील रेलिंग सुद्धा तुटले आहे. आठवडी बाजारात शिरलेल्या पुराच्या प्रवाहाने संरक्षण भिंत फोडून पाण्याने आपला मार्ग बदलवून त्या पाण्याने थेट नदीपात्रात प्रवेश केला होता. मात्र, घटना घडून अनेक दिवस उलटूनही संबंधित विभागाने संरक्षण भिंतीच्या दुरुस्तीकडे अद्याप कोणतेही ठोस पावले उचललेली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

पुराच्या पाण्याचा सर्वाधिक फटका संरक्षण भिंत व पदरस्त्याला बसला आहे. भिंतीचा भाग कोसळल्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली असून नागरिकांना मोठा वळसा घेऊन प्रवास करावा लागत आहे.

गावाला पुन्हा पूराचा धोका

- स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, संरक्षण भिंत ही नदीच्या पुराच्या पाण्यापासून गावाचे संरक्षण करणारी महत्त्वाची संरचना आहे. यंदाच्या पावसात भिंतीला पडलेला तडा वेळेत दुरुस्त न झाल्यास पुढील मुसळधार पावसात भिंतीचा आणखी मोठा भाग कोसळू शकतो. त्यामुळे पुराचे पाणी थेट गावात व आठवडी बाजार परिसरात शिरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

- तात्काळ पाहणी करून दुरुस्तीचा निर्णय घेण्यात येईल. पूर संदर्भात प्रत्यवहार झालेला आहे.  

  - सागर अलाटकर  

  उपअभियंता, जलसंपदा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages