जनता सहकारी बँक, शाखा शिरजगाव कसबा लोकार्पण सोहळा - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Tuesday, August 11, 2026

जनता सहकारी बँक, शाखा शिरजगाव कसबा लोकार्पण सोहळा

 

खातेदाराच्या विश्वासाला जनता सहकारी बँक  खरी उतरली

आमदार प्रवीण तायडे : शिरजगावकसबा येथे बँकेच्या नवीन शाखा इमारतीचा लोकार्पण सोहळा

शिरजगाव कसबा ११
(ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : 
     
आजच्या काळात बँक सुरू करणे सोपे आहे, मात्र ती यशस्वीपणे चालवणे कठीण आहे. गरजू लोकांना न्याय देत काटेकोरपणे आणि शिस्तीने कारभार केल्यामुळे जनता सहकारी बँक आहाही ग्राहकांच्या विश्वासाला खरी उतरली आहे, असे प्रतिपादन आमदार प्रवीण तायडे यांनी शिरजगावकसबा येथे केले. 

जनता सहकारी बँक शाखेच्या  तीन मजली नवीन इमारतीचा लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष अविनाश बदुकले होते. प्रमुख पाहुणे म्हणून खासदार डॉ.अनिल बोंडे, आमदार प्रवीण तायडे, आमदार प्रताप अडसड, आमदार बच्चू कडू, अमरावती जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र महल्ले, विभागीय नागरी सहकारी बँक असोसिएशनचे अध्यक्ष अरविंद गावंडे, विदर्भ नागरी सहकारी बँक असोसिएशनचे नागपूर येथील संचालक राजेंद्र हांडे, जिजाऊ बँकेचे अध्यक्ष बबनराव आवारे,बँकेचे माजी अध्यक्ष केशवराव दाभाडे, माजी संचालक डॉ. शैलजा गुर्जर तसेच स्वागताध्यक्ष अरुण अकोटकर उपस्थित होते. 

यावेळी बँकेचे संस्थापक अध्यक्ष स्व. डॉ. वसंतराव गुर्जर यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. उत्कृष्ट कामगिरीबद्दल बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक निमकर आणि शिरजगावकसबा शाखेचे व्यवस्थापक सतीश दारोकर यांचा सत्कार करण्यात आला आहे.

संचालन प्राजक्ता राऊत यांनी केले, आभार अनिल सुने यांनी मानले. कार्यक्रमाला बँकेचे ग्राहक, सभासद आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages