रंजनाताई नीचळ यांचा सेवानिवृत्ती निरोप समारंभ उत्साहात संपन्न. - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Wednesday, August 12, 2026

रंजनाताई नीचळ यांचा सेवानिवृत्ती निरोप समारंभ उत्साहात संपन्न.

 


​अमरावती दिनांक १२

(ग्रामीण उदय न्यूजनेटवर्क )

    महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँक, अमरावती शाखा येथे प्रदीर्घ काळ आपल्या उत्कृष्ट आणि निष्ठावंत सेवेने बँक तसेच ग्राहकांच्या मनात आदराचे स्थान निर्माण करणाऱ्या रंजनाताई गोपाळकृष्ण नीचळ यांचा निरोप समारंभ अत्यंत स्नेहमय आणि उत्साही वातावरणात होटल मानसरोवर येथे पार पडला आहे .

  नीचळ कौटुंबिक मंडळींनी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

​दीर्घकालीन सेवेनंतर सन्मानाने सेवानिवृत्त होणाऱ्या रंजनाताईंच्या कार्याचा गौरव करण्यासाठी बँक कर्मचारी, अधिकारी वर्ग, स्नेही आणि नीचळ परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

​कार्याचा गौरव आणि सन्मान

​कार्यक्रमाच्या सुरुवातीला रंजनाताई नीचळ यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन चिं शंतनू व कन्यारत्न डॉ.शिवानी यांनी केला. बँक प्रशासनाच्या वतीने भावूक वातावरणात विशेष नागरी सत्कार करण्यात आला आहे.

​बँकेतील सहकाऱ्यांनी आपल्या मनोगतातून रंजनाताईंच्या कामातील तत्परता, सहकाऱ्यांना मदत करण्याची वृत्ती आणि बँकेच्या प्रगतीत असणारे त्यांचे योगदान यांचा आवर्जून उल्लेख केला. रंजनाताईं केवळ एक सहकारी नव्हत्या, तर बँकेतील संपूर्ण टीमसाठी एका मार्गदर्शक ज्येष्ठ भगिनीसारख्या होत्या, अशा भावना सहकाऱ्यांनी व्यक्त केल्या.

​सोहळ्यात कौटुंबिक मंडळींनी रंजनाताईंच्या आजवरच्या प्रवासाला उजाळा दिला. घरची जबाबदारी उत्तमरीत्या सांभाळत त्यांनी बँकेतील नोकरी ज्या निष्ठेने व कौशल्याने पूर्ण केली, याचा नीचळ परिवाराला अभिमान असल्याचे मत कुटुंबातील सदस्यांनी व्यक्त केले.

​बँकेतील सेवाकाळात मिळालेले सहकाऱ्यांचे सहकार्य आणि ग्राहकांचे प्रेम हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा ठेवा आहे. सहकाऱ्यांचे सहकार्य आणि कुटुंबाची साथ यांमुळेच हा प्रदीर्घ प्रवास सुकर आणि समृद्ध झाला," अशा शब्दांत रंजनाताईंनी आपले मनोगत व्यक्त करत सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाचे संचालन कंचन मूरके यांनी आपल्या साहित्यिक भाषेतून केले.

​​कार्यक्रमाचा शेवट स्नेहभोजनाने झाला. उपस्थितांनी रंजनाताईंना त्यांच्या पुढील वाटचालीस, निरोगी आयुष्यास व सेवानिवृत्त जीवनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. संपूर्ण सोहळा अत्यंत भावूक व आठवणींनी समृद्ध असा झाला आहे.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages