एक पाऊल पाण्यासाठी: महा वॉकेथॉनमध्ये सहभागी व्हा- जिल्हाधिकारी आशिष येरेकर - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, August 20, 2026

एक पाऊल पाण्यासाठी: महा वॉकेथॉनमध्ये सहभागी व्हा- जिल्हाधिकारी आशिष येरेकर

 

 


21 ऑगस्ट रोजी ‘महा वॉकेथॉन
’चे आयोजन

 

क्युआर कोडद्वारे सहभागासाठी नोंदणी

 

अमरावती, दि. २० (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): जलसंधारणाचे महत्त्व जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी अमरावती  शहरात शुक्रवारी, 21 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजता ‘महा वॉकेथॉन : ‘वॉक फॉर वॉटर’ चे आयोजन करण्यात आले आहे. क्युआर कोड व अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करून नागरिकांना सहभागी होता येणार आहे. वॉकेथॉनद्वारे जलसंवर्धन, पाणी बचत आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार असून नागरिकांना  मोठया संख्येने सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे.

 

      ‘एक पाऊल जलसंधारणासाठी, एक पाऊल शाश्वत भविष्यासाठी’ हा संदेश सर्वदूर पोचविण्यासाठी  जिल्हाधिकारी कार्यालय व मृद व जलसंधारण विभागाच्यावतीने  शनिवारी सकाळी  6 वाजता या ‘महा वॉकेथॉन : ‘वॉक फॉर वॉटर’चे आयोजन केले आहे. श्री.शिवाजी  शारीरिक शिक्षण महाविद्यालयापासून या वॉकेथॉनला सुरुवात होणार असून पुढे गर्ल्स हायस्कुल चौक, जिल्हा कोषागार कार्यालय आणि सिंचन भवन असा मार्ग असणार आहे. शिवाजी  शारीरिक शिक्षण महाविद्यालय येथेच वॉकेथॉनचा समारोप होणार आहे. जलसंधारणाच्या लोकचळवळीला बळ देण्यासाठी आयोजित या उपक्रमात नागरिक, विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, विविध शासकीय विभागांचे अधिकारी-कर्मचारी आणि जलसंवर्धन क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. क्युआर कोड व संकेतस्थळावर नोंदणी

 

महा वॉकॅथॉन - वॉक फॉर वॉटरमध्ये सहभागी होण्यासाठी नागरिकांनी दिलेल्या क्युआर कोडद्वारे किंवा https://register.mahaevent.co.in/ या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. वेळेत नोंदणी करून या उपक्रमाचा भाग व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

                                                       


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages