सेंट्रल बँक ऑफ इंडिया तर्फे 21 ऑगस्ट रोजी अमरावती येथे ‘विविध कर्ज वितरण शिबीरा’चे आयोजन - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, August 20, 2026

सेंट्रल बँक ऑफ इंडिया तर्फे 21 ऑगस्ट रोजी अमरावती येथे ‘विविध कर्ज वितरण शिबीरा’चे आयोजन

 

 

अमरावती, दि.२० (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या वतीने  21 ऑगस्ट  रोजी सायंकाळी 7.00 वाजता गाडगे बाबा महाराज हॉल, गाडगे नगर येथे  विविध किरकोळ कर्ज योजनांची माहिती देण्यासाठी ‘ विविध कर्ज वितरण शिबीरा’चे आयोजन करण्यात आले आहे.

 

           या शिबीरामध्ये नागरिकांना सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या विविध किरकोळ कर्ज योजनांची सविस्तर माहिती देण्यात येणार आहे. यामध्ये गृह कर्ज, वाहन कर्ज, गोल्ड लोन, पर्सनल लोन तसेच मॉर्टगेज लोन यांचा समावेश आहे. ग्राहकांना बँकेच्या विविध कर्ज योजनांच्या अटी, पात्रता, आवश्यक कागदपत्रे तसेच उपलब्ध व्याजदर याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

 

      या कार्यक्रमास सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे वरिष्ठ क्षेत्रीय प्रबंधक  सुनील पाण्डेय यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून, विविध शासकीय विभागांचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित राहणार आहेत. नागरिकांनी मोठ्या संख्येने या शिबिराला उपस्थित राहून बँकेच्या विविध कर्ज योजनांची माहिती घेऊन त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन अग्रणी जिल्हा व्यवस्थापक नरेश हेडाऊ यांनी केले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages