जिल्ह्यातील मागासवर्गीय शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू; १५ सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन अर्जाचे आवाहन - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Saturday, August 8, 2026

जिल्ह्यातील मागासवर्गीय शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू; १५ सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन अर्जाचे आवाहन


अमरावती, दि. ८ : सामाजिक न्याय विभागाअंतर्गत कार्यरत असलेल्या जिल्ह्यातील मागासवर्गीय मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहामध्ये शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि आर्थिकदृष्ट्या मागास  प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी १५ सप्टेंबर २०२६ पर्यंत https://hmasnew.mahait.org संकेतस्थळावर  अर्ज करता येणार आहे.

            सामाजिक न्याय विभागाच्या  वसतिगृहांमध्ये प्रवेशित मुला-मुलींना सर्व सोयी-सुविधा मोफत पुरविल्या जातात.व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर त्याची प्रत आवश्यक कागदपत्रांसह संबंधित वसतिगृहात ऑफलाईन स्वरूपात १५ सप्टेंबर पर्यंत सादर करणे आवश्यक आहे. मुलांसाठी अमरावती शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह (युनिट क्र. १, २, ३ - निंभोरा), भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह (निंभोरा), संत गाडगे महाराज मुलांचे शासकीय वसतिगृह (निंभोरा) येथे तर मुलींनी  क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले शासकीय वसतिगृह (कॅम्प अमरावती),  क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले शासकीय वसतिगृह (कॅम्प अमरावती - जुने नाव: गुणवंत) , क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले शासकीय वसतिगृह (युनिट क्र. ४ - जेल रोड) आणि  क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले शासकीय वसतिगृह (जुने नाव: १२५ जयंती) येथे अर्ज सादर करता येणार आहे.

याशिवाय जिल्ह्यातील तालुका स्तरावरील मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहांमध्येही व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी अर्ज स्वीकारले जात आहेत. पात्र व गरजू विद्यार्थ्यांनी मुदतीत आपले अर्ज संबंधित वसतिगृहाकडे सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण, अमरावतीचे सहाय्यक आयुक्त  राजेंद्र जाधवर  यांनी केले आहे.

           वसतिगृह प्रवेश  वर्ष २०२६-२७ नुसार ७ ऑगस्ट  ते १५ सप्टेंबर २०२६ दरम्यान  ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. प्रवेशाची यादी  २२ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध होणार आहे. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक ७२१-२६६१२६१ वर संपर्क साधता येणार आहे.

                                           

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages