शोध___इंद्रपुरी अमरावती - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, August 13, 2026

शोध___इंद्रपुरी अमरावती

 दि. १३:-


वर्हाड सोन्याची कर्हाड  (अमरावतीचे वैभव)
हा शब्दप्रयोग प्रसंगी वापरल्या जातो.....

त्याला एक अर्थ आहे _

अमरावती... अकोला..

यवतमाळ.... बुलडाणा 

ह्या चार तालुक्याचा समावेश असलेल्या भागाला पूर्वी वर्हाड म्हणून ओळखले जात असे......

विशेष म्हणजे या चारही तालुक्यात कपाशीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे येथे आर्थिक सुबत्ता असायची......

अमरावती हे कापसाच्या खरेदी _ विक्रीचे मुख्य केंद्र असल्यामुळे येथे आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणात होत असे.....

वर्हाडातील संपन्न शहर अशी ओळख असलेल्या अमरावती वर  लुटारू पेंढार्यांचे लक्ष वळताच शहर भयभीत झाले.....

२४ नोव्हेंबर १८०५  च्या काळरात्री सशस्त्र पेंढार्यांच्या एका टोळीने शहरात प्रवेश केला....

आल्या आल्याच त्यांनी धुमाकूळ घातला.....

भीतीग्रस्थ लोक आपला जीव मुठीत धरून लपून बसले.....

आलेल्या अनपेक्षित संकटाला तोंड देण्यासाठी शहरातील सर्व व्यापारी एकत्र आले.....

क्रूर पेंढार्या कडून कोणतेही क्रौर्य घडू नये यासाठी सर्व व्यापार्यांनी एकत्र येऊन पैसा गोळा केला __

आणि ७ लाख रुपयांचा नजराणा लुटारूंच्या हवाली केला....

पैशांची थैली घेऊन पेंढारी परत गेले आणि शहराने सुटकेचा श्वास घेतला......

त्याकाळी वर्हाडचे अधिपत्य निजामाकडे होते..... बातमी समजताच त्याने शहराच्या रक्षणासाठी संरक्षक भिंत बांधण्याचा निर्णय घेतला.....

१८०६ ते १८२१ ह्या कालावधीत एका मजबूत परकोटाचे 

( भिंतीचे ) बांधकाम पूर्ण झाले.....

आज हयात असलेल्या ह्या परकोटाची लांबी 

३ किलोमीटर आणि उंची २० ते २५ असून त्याला एकूण ५ वेगवेगळ्या नावाचे दरवाजे आहेत __

अंबागेट.... भूसारी गेट..

खोलापूरी गेट.....

महाजन पूरा गेट आणि 

नागपूरी गेट.....

ह्या सर्व गेटला असलेले मौल्यवान सागवानाचे  

१८ फूट उंचीचे दरवाजे 

( जिर्ण झालेले का असेना ) पण गतकाळाची आठवण करून देतात.....

निजामाची राजवट संपुष्टात आणून इंग्रजांनी जेंव्हा संपूर्ण भारतावर आपले एकछत्री साम्राज्य स्थापन केले तेंव्हा स्वातंत्र्याचे वारे देशभर वाहू लागले.....

१९२६ मध्ये अमरावतीचे सुपुत्र _ वीर वामनराव जोशी यांनी _

भूसारी गेट ( आजचे जवाहर गेट ) वर तिरंगा फडकवला होता.....

वीर वामनराव जोशी यांनी नेमकी ह्याच गेटची निवड का केली हा विषय औत्सुक्याचा आहे......

जयस्तंभ ते सराफा बाजार हा भाग शहराच्या मध्यवर्ती भागात असून रोडच्या दोन्ही बाजूला व्यापारी प्रतिष्ठान आहेत.....

त्यामुळे जून्या अमरावती मध्ये प्रवेश करण्यासाठी जवाहर गेट हे अधिक महत्त्वाचे मानले जाते......

शिवाय ह्या जवाहर गेटचे वेगळे वैशिष्ट्य सुद्धा नमूद करण्याजोगे आहे......

१९५० च्या सुमारास अमरावती नगरपालिकेच्या वतीने ह्या गेटवर एक अनोखे घड्याळ बसविण्यात आले.....

शहराची धडधड असलेले हे घड्याळ कलकत्ता येथून त्याकाळी १ हजार ७०० रूपयाला विकत आणले होते.....

ब्रिटिश इंजिनिअरींगचा उत्कृष्ट नमुना असलेले हे घड्याळ एकदा चावी दिली की ७ दिवस चालते.....!

२०० वर्षांचा कालावधी पार पडूनही परकोट आणि त्याला असलेले दरवाजे आजही इतिहासाची साक्ष देतात

हेच अमरावतीचे इतिहासकालीन वैभव होय म्हटल्यावर वावगे ठरू नये.

संकलन -

 नानासाहेब देवतळे शिरसगाव कसबा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages