डिजिटायझेशन प्रक्रियेतील जाचक अट रद्द करा * तात्यासाहेब मेश्राम - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, August 13, 2026

डिजिटायझेशन प्रक्रियेतील जाचक अट रद्द करा * तात्यासाहेब मेश्राम


अमरावती दिनांक १३ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क):

     महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाने जन्म व मृत्यू प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी जुन्या मूळ प्रमाणपत्राची स्कॅन प्रत जोडण्याची जाचक अट घातल्याने प्रमाणपत्रे मिळत नाहीत तसेच जिल्हाभरात केवळ एकच निबंधक असल्याने विलंब होत आहे. यातील दोष दूर करून सुलभ रितीने तथा विनाविलंब प्रमाणपत्र मिळावे यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात अशी मागणी भाजपाचे अमरावती जिल्हा परिषदेचे माजी सभापती तात्यासाहेब मेश्राम यांनी जिल्ह्यातील पाच आमदारांना केली आहे.

   यासंदर्भात अधिक असे की, डिजिटायझेशन प्रक्रिया अंतर्गत सुरक्षा व उपायाचे तत्व नमूद करण्यात आले आहे. नागरिकांच्या जन्म व मृत्यू नोंदीणे प्रमाणपत्र मिळवताना पूर्वी स्थानिक संस्थांच्या पातळीवर अत्यंत सुलभ पद्धतीची व्यवस्था होती. परंतू शासनाच्या आरोग्य विभागाने CRS पोर्टल वरूनच असे प्रमाणपत्र सुरक्षेच्या बाबी लक्षात घेऊ डिजिटल सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी देण्याचा निर्णय घेतला. या अंतर्गत महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत आणि ग्रामपंचायत या चारही स्तरावरील क्षेत्रातील संस्थांमधील नोंदी केवळ जिल्हा परिषदेच्या निबंधक मार्फत पोर्टल वरूनच घेण्याची एकमेव सोय करण्यात आल्याने जिल्हाभरातील मोठ्या प्रमाणात प्लकरणे महिनोन्महिने होत नसल्याने विद्यार्थ्यांना शालेय कामासाठी त्रास होतो आहे तसेच नागरिकांना शासकीय कामासाठी वेळेवर प्रमाणपत्र प्राप्त होत नाही. यासाठी शहर व ग्रामीण असे दोन निबंधकाची व्यवस्था करणे सुलभतेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे नवीन प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी जुने प्रमाणपत्र सादर करण्याची जाचक अट रद्द करावी. या अटीमुळे पोर्टल प्रकरण थेट रिजेक्ट करते आहे.

  प्रस्तुत मागणी आम. प्रविण पोटे पाटील, आम प्रताप अडसड, आम उमेश यावलकर व आम प्रवीण पोटे यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages