स्कूल बसमध्ये कंडक्टर अनिवार्य करा.--तात्या मेश्राम माजी जि. प. सभापती अमरावती - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Wednesday, August 12, 2026

स्कूल बसमध्ये कंडक्टर अनिवार्य करा.--तात्या मेश्राम माजी जि. प. सभापती अमरावती

रिद्धपूर दिनांक१२
( ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क)



अमरावती जिल्हा परिषदेचे माजी सभापती तात्या मेश्राम यांनी स्कूल बसमध्ये कंडक्टर (वाहक) अनिवार्य करण्याची अत्यंत महत्त्वाची मागणी केली आहे. 

रिद्धपूर येथे  अत्यंत मन हेलावून टाकणारी दुर्घटना घडली आहे. स्थानिक रवींद्र ठाकरे यांच्या ७ वर्षीय चिमुकलीला (ईश्वरी ठाकरे) स्कूल बसने धक्का दिला आणि तिच्या डोक्यावरून चाक गेल्याने तिचा करूण अंत झाला आहे .

 याचवेळी जर बसमध्ये कंडक्टर असता आणि त्यांनी विद्यार्थ्यांना सुरक्षित ठिकाणी उभे करून खात्री करून बस ढकलली असती तर असा जिवघेणा प्रसंग ओढवला नसता.

   प्रशासनाने यासंदर्भात लवकरच निर्णय घ्यावा आणि वाहतूक नियम अधिक विस्तारण्याची गरज आहे.यासाठी स्कूल बसमध्ये कंडक्टर अनिवार्य केला पाहिजे. आणि त्यांनी विद्यार्थ्यांना सुरक्षित पणे उतारचढ करून सुरक्षित जागेवर ठेऊनच मार्गक्रमण केले पाहिजे.

या दुर्दैवी अपघातामुळे अमरावती जिल्ह्यात शाळकरी मुलांच्या वाहतुकीचा आणि त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून तात्या मेश्राम यांच्या या मागणीला पालकांकडूनही मोठा पाठंबा मिळत आहे.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages