शोध.....


दि. १२ अमरावती:


अमरावती महिला रुग्णालयाला डफरीन हाॅस्पिटल हे नाव कसे दिले?

इंग्रजी राजवटीत स्रीयां आणि मुलांसाठी अमरावती ला वेगळे रुग्णालय असावे ही संकल्पना मांडली _

त्यावेळचे ब्रिटिश गव्हर्नर लॉर्ड डफरिन यांच्या पत्नीने त्यांच्याच इच्छेनुसार अमरावती च्या जून्या बस स्टँड समोर जागा विकत घेऊन १८९५ ला इमारत पूर्ण करण्यात आली......

पण पूढे पूढे वाढत्या रूग्णांच्या संख्येमुळे दवाखान्याची जागा अपुरी पडू लागली.....

त्यामुळे बस स्टँड समोरील रूग्णालयाची जागा विकून आलेल्या पैशात अनेक दानशूर मंडळींनी सढळ हाताने मदत केली.....

आज आधुनिक उपचारांचे केंद्र बनलेले अमरावतीचे 'जिल्हा स्त्री रुग्णालय' (डफरीन हॉस्पिटल) हा केवळ एक पांढरा ऐतिहासिक वास्तूचा सांगाडा नाही, तर तो अमरावतीकरांच्या एकजुटीचा आणि अनेक थोर दानशूरांच्या उदारतेचा जिवंत दस्तऐवज आहे District Women Hospital, Amravati. ब्रिटिशांच्या राजवटीत सुरू झालेल्या एका छोट्या कल्पनेचे रूपांतर आज एका भव्य आरोग्य मंदिरात झाले असून या प्रवासाला तब्बल १३5 हून अधिक वर्षांचा इतिहास लाभला आहे.

यामध्ये हैदराबाद चे निजाम वलगावचे गणेडीवाल आणि अनेक दानशूर मंडळी आघाडीवर होती...

१९३३ मध्ये अमरावती नगर पालिकेच्या वतीने श्रीकृष्ण पेठ येथे ३ एकर जागेत नवीन इमारतीच्या बांधकामास सुरुवात झाली....आणि १९३९ ती इमारत पूर्ण झाली.......

जिल्ह्यातील स्त्रीयांच्या प्रकृती अस्वास्थ्यासाठी योग्य उपचार करणारे जिल्हा रुग्णालय अनेक दानशूर मान्यवरांच्या उदार भूमिकेतून उभे करण्यात आले.....!

आजही हे रुग्णालय 'जिल्हा स्त्री रुग्णालय (डफरीन)' याच नावाने संपूर्ण विदर्भात ओळखले जाते. शेकडो माता-भगिनींच्या आरोग्याची काळजी घेणारी ही वास्तू अमरावतीच्या नागरिकांनी स्वतःचा पैसा आणि रक्त आटवून उभी केली आहे, हेच या रुग्णालयाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे.

संकलन -नानासाहेब देवतळे शिरजगाव कसबा


Post a Comment

0 Comments