पद्मश्री डॉ. एस. आर. रंगनाथन जयंतीनिमित्त ओरिएंटेशन कार्यक्रम - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, August 13, 2026

पद्मश्री डॉ. एस. आर. रंगनाथन जयंतीनिमित्त ओरिएंटेशन कार्यक्रम



नमस्कार | अमरावती
अमरावती (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क)




श्री दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्ट, अमरावती अंतर्गत तक्षशिला महाविद्यालय, ग्रंथालय विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे ग्रंथालय शास्त्राचे जनक पद्मश्री डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त  बुधवारी ओरिएंटेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्ट, अमरावतीचे सचिव तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कमलाकर पायस, प्रमुख मार्गदर्शक म्हणून शासकीय ग्रंथालयाचे सहाय्यक ग्रंथालय संचालक डॉ. राजेश पाटील, तर प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ. प्रितेश पाटील, प्राचार्य, तक्षशिला महाविद्यालय उपस्थित होते.

यावेळी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना डॉ. कमलाकर पायस यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासामध्ये ग्रंथालयाचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांनी ग्रंथालयातील उपलब्ध पुस्तकांचा, संदर्भग्रंथांचा तसेच डिजिटल व ई-संसाधनांचा नियमित वापर करून आपल्या ज्ञानाचा विस्तार करावा, असे आवाहन त्यांनी केले. आजच्या माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात केवळ पाठ्यपुस्तकांपुरते मर्यादित न राहता विविध विषयांचे वाचन, अवांतर वाचन आणि संशोधनवृत्ती विकसित करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. एस. आर. रंगनाथन यांनी ग्रंथालय क्षेत्राला दिलेले योगदान आजही मार्गदर्शक असून, त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन विद्यार्थ्यांनी ज्ञानाधिष्ठित समाज निर्मितीत योगदान द्यावे, असेही त्यांनी प्रतिपादन केले. डॉ. राजेश पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनातून ग्रंथालयाचा प्रभावी वापर, उपलब्ध ग्रंथसंपदा, ई-संसाधने, डिजिटल लायब्ररी तसेच माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शैक्षणिक माहिती मिळविण्याच्या विविध साधनांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. त्यांनी डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या ग्रंथालय शास्त्रातील मूलभूत योगदानावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचे संचालन ग्रंथपाल डॉ. प्रणाली पेटे यांनी केले, तर आभार डॉ. प्रवीण वानखडे यांनी मानले.
या कार्यक्रमास डॉ अनिल भगत, डॉ. सनोबर कहेकशा, डॉ. संदीप हाडोळे, डॉ. रुपेश बेलसरे, डॉ. आनंद देशमुख, निरुपमा भोरे, मोनाली पाटील आणि सचिन कुमरे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री उमेश अरगुलवार, श्री अमोल तरोडकर आणि श्री राजरतन सुरवाडे यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि मान्यवरांच्या मार्गदर्शनामुळे कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages