'डिजिटल श्रम संकल्प' आयडियाथॉन स्पर्धेत तरुण आणि नवोन्मेषकांना नाविन्यपूर्ण विचार मांडण्याची संधी - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, August 6, 2026

'डिजिटल श्रम संकल्प' आयडियाथॉन स्पर्धेत तरुण आणि नवोन्मेषकांना नाविन्यपूर्ण विचार मांडण्याची संधी



अमरावती, दि.६:
केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयाने 'डिजिटल इंडिया' आणि 'विकसित भारत' संकल्पनेला गती देण्यासाठी 'डिजिटल श्रमसंकल्प आयडियाथॉन' स्पर्धा जाहीर केली आहे. 'इनोव्हेट इंडिया'(MyGov) प्लॅटफॉर्मवर आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत ४ सप्टेंबर २०२६ पर्यंत सायंकाळी ५.४५ वाजेपर्यंत जिल्ह्यातील विद्यार्थी, तंत्रज्ञान व्यावसायिक,स्टार्टअप्स, उद्योजक आणि आयआयटीएन्सना नाविन्यपूर्ण विचार मांडण्याची संधी मिळणार आहे.

    या उपक्रमांतर्गत कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय),डेटा ॲनालिटिक्स आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून 'ई-श्रम' नॅशनल करिअर सर्विस आणि श्रम सुविधा पोर्टल २.० अधिक मजबूत आणि प्रभावी करण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे. या माध्यमातून कामगार कल्याण, रोजगार सेवांचा विस्तार आणि सरकारी नियमांचे पालन अधिक सोपे करण्याचा सरकारचा मनोदय आहे.

  असे होता येणार सहभागी

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इनोव्हेट इंडिया'(MyGov) प्लॅटफॉर्मवर, तसेच ,https://innovateindia.mygov.in/digital-shram-sankalp  वर नोंद करता येणार आहे.

सर्वोत्तम कल्पनेसाठी आकर्षक पारितोषिके

     स्पर्धेत मांडण्यात आलेल्या प्रत्येक समस्येच्या निदानासाठी निवडलेल्या पहिल्या ५ सर्वोत्तम कल्पनांना आकर्षक रोख रकमेच्या पारितोषिकांनी गौरविण्यात येईल. तसेच सर्व पात्र सहभागींना मंत्रालयाकडून अधिकृत 'डिजिटल प्रमाणपत्र' प्रदान करण्यात येईल. विजेत्या संघांना किंवा व्यक्तींना श्रम व रोजगार मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर थेट कल्पना सादर करण्याची संधी मिळणार आहे. स्पर्धेत निवड झालेल्या संकल्पनेचा प्रत्यक्ष सरकारी पातळीवर पथदर्शी प्रकल्प म्हणून समावेश करण्यात येऊ शकतो.

    श्रम परिसंस्था अधिक पारदर्शक आणि समावेशक बनविण्यासाठी तरुण आणि नवसंशोधकांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.





Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages