शिरजगाव कसब्यात मोकाट गुरांचा रस्त्यांवर सुळसुळाट; वाहनधारक त्रस्त, - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, August 20, 2026

शिरजगाव कसब्यात मोकाट गुरांचा रस्त्यांवर सुळसुळाट; वाहनधारक त्रस्त,

 अपघातांची मालिका रोखण्यासाठी ग्रामपंचायतीने कडक पावले उचलण्याची गरज!

दि. २१ ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क, विद्या दाभाडे 


शिरजगाव कसबा:
शिरजगाव कसबा आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून मोकाट गुरे-ढोरांचा रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर सुळसुळाट झाला आहे. मुख्य रस्ते, बाजारपेठा आणि शासकीय इमारतींच्या समोरील रस्त्यांवर भर चौकात ही गुरे कळपाने ठाण मांडून बसत असल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत असून अपघातांचा धोका कमालीचा वाढला आहे.
रस्त्यांच्या मधोमध गायी आणि इतर गुरे अचानक येऊन उभी राहत असल्यामुळे दुचाकी आणि चारचाकी वाहनधारकांना अचानक ब्रेक लावावा लागतो. अंधाराच्या वेळी किंवा वळणावर रस्त्यावर बसलेली ही गुरे सहज दिसत नाहीत, ज्यामुळे अनेक लहान-मोठे अपघात घडतात . अनेक दुचाकीस्वार या गुरांना वाचवण्याच्या नादात घसरून पडल्याच्या घटना घडल्या आहेत.
काही वेळेस ही गुरे रस्त्यावरच एकमेकांशी भिडतात, अशा वेळी बाजूने जाणाऱ्या पादचाऱ्यांना गंभीर दुखापत होण्याची शक्यता असते. 
काही बेजबाबदार पशुपालक आपली गुरे दूध काढल्यानंतर किंवा दिवसभर चरण्यासाठी मोकळी सोडून देतात. ही गुरे गावातील रस्त्यांवर भटकण्यासोबतच आजूबाजूच्या शेतांमध्ये घुसून उभ्या पिकांचे मोठे नुकसान करतात . स्वतःच्या फायद्यासाठी मुक्या प्राण्यांना रस्त्यावर बेवारस सोडणाऱ्या अशा पशुपालकांवर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.
शिरजगाव कसब्यातील त्रस्त नागरिक आणि वाहनधारकांनी या समस्येकडे स्थानिक प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. ग्रामपंचायतीने तात्काळ पुढाकार घेऊन गावातील मुख्य रस्ते गुरांच्या विळख्यातून मुक्त करावेत, अशी  मागणी आता जोर धरू लागली आहे.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages