पूर्व परवानगी शिवाय वर्गणी गोळा केल्याचे सिद्ध झाल्यास शिक्षा
अमरावती, दि.२१ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था वगळून जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांतर्फे वर्गणी गोळा करण्याकरिता धर्मदाय उपआयुक्त किंवा सहायक धर्मदाय आयुक्त अमरावती यांची पूर्वपरवानगी घ्यावी, असे आवहन धर्मदाय सह आयुक्त दीपक खोचे यांनी केले आहे. पूर्व परवानगी शिवाय वर्गणी गोळा केल्याचे सिद्ध झाल्यास तीन महिन्या पर्यंत साध्या कारावासाची किंवा संकलीत रकमेच्या दीडपट द्रव्य दंडाची शिक्षा होऊ शकते असेही सांगण्यात आले आहे.
महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 च्या कलम 41-क नुसार सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था वगळून जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांतर्फे गणेशोत्सव कार्यक्रमासाठी रोख रकमेच्या किंवा वस्तूच्या स्वरूपात पैसा,देणगी किंवा वर्गणी गोळा करण्याच्या पूर्वपरवानगीकरिता www.Charity.Maharashtra.gov.in
नियमाचे उल्लंघन करून पूर्व परवनगी न घेता वर्गणी गोळा केल्याचे सिद्ध झाल्यास तीन महिन्या पर्यंत साध्या कारावासाची किंवा संकलीत रकमेच्या दीडपट द्रव्य दंडाची किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकते असे धर्मदाय सह आयुक्त कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.