आज ‘महा वॉकेथॉन’चे आयोजन - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, August 21, 2026

आज ‘महा वॉकेथॉन’चे आयोजन

 नागरिकांना सहभागी होण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन

सहभागासाठी ऑनलाइन नोंदणी

 

अमरावती, दि.२० (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): जनसामान्यांपर्यंत जलसंधारणाचे महत्त्व पोहोचविण्यासाठी अमरावती शहरात आज 21 ऑगस्ट रोजी  सकाळी 6 वाजता ‘महा वॉकेथॉन : ‘वॉक फॉर वॉटर’चे आयोजन करण्यात आले आहे. क्युआर कोड व अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करून नागरिकांना सहभागी होता येणार आहे. जलसंवर्धन, पाणी बचत आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश वॉकेथॉनद्वारे नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार असून मोठया संख्येने सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे.

 

जिल्हाधिकारी कार्यालय व मृद व जलसंधारण विभागाच्यावतीने ‘एक पाऊल जलसंधारणासाठी, एक पाऊल शाश्वत भविष्यासाठी’हा संदेश सर्वदूर पोचविण्यासाठी  शनिवारी सकाळी  6 वाजता या ‘महा वॉकेथॉन : ‘वॉक फॉर वॉटर’चे आयोजन करण्यात आले आहे. या वॉकेथॉनला श्री.शिवाजी  शारीरिक शिक्षण महाविद्यालयापासून सुरुवात होणार आहे. पुढे गर्ल्स हायस्कुल चौक, जिल्हा कोषागार कार्यालय आणि सिंचन भवन असा मार्गे शिवाजी  शारीरिक शिक्षण महाविद्यालय येथेच वॉकेथॉनचा समारोप होणार आहे.

 

या उपक्रमात नागरिक, विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, विविध शासकीय विभागांचे अधिकारी-कर्मचारी आणि जलसंवर्धन क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होत जलसंधारणाच्या  लोकचळवळीला  बळ देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ऑनलाईन  नोंदणी

 

नागरिकांनी महा वॉकॅथॉन - वॉक फॉर वॉटरमध्ये सहभागी होण्यासाठी दिलेल्या क्युआर कोडद्वारे किंवा https://register.mahaevent.co.in/ या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे.                                                                     


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages