मुंबई शहर व उपनगर जिल्ह्यात प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेतून मातांना आर्थिक आधार - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, August 21, 2026

मुंबई शहर व उपनगर जिल्ह्यात प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेतून मातांना आर्थिक आधार



मुंबई
, दि. २०
: प्रधानमंत्री मातृ वंदना योजना ही गर्भवती व स्तनदा महिलांचे पोषण व आरोग्य सुधारण्यास, प्रसूतीपूर्व तपासणी व बालकाच्या लसीकरणास प्रोत्साहन देण्यासाठी राबविण्यात येते. योजनेअंतर्गत पहिल्या अपत्यासाठी एकूण ५ हजार रुपये आणि दुसरे अपत्य मुलगी असल्यास ६ हजार रुपये आर्थिक लाभ देण्यात येतो. मुंबई शहर जिल्ह्यात २०२६-२७ मध्ये आतापर्यंत ४,६७६ लाभार्थ्यांना, तर मुंबई उपनगर जिल्ह्यात 16,708 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आले आहेत.

पात्र महिलेने जवळच्या अंगणवाडी किंवा उप-आरोग्य केंद्रात गर्भधारणेची नोंदणी करून आवश्यक तपासण्या व लसीकरणाची पूर्तता केल्यास या योजनेचा लाभ घेता येतो.  

गर्भधारणेदरम्यान महिलांचे पोषण व आरोग्य सुनिश्चित करणे. गर्भवती महिलांना वेळेवर प्रसूतीपूर्व तपासणी करण्यास प्रोत्साहित करणे. बालकाच्या जन्मानंतर आवश्यक लसीकरणास प्रोत्साहन देणे. माता व बालकाच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक शासकीय सेवांचा लाभ मिळवून देणे हे या योजनेचे उद्दिष्टे आहे.

या योजनेअंतर्गत पहिल्या अपत्यासाठी  एकूण ५ हजार रुपये आर्थिक सहाय देण्यात येते. यामध्ये पहिला हप्ता ३ हजार रुपये गर्भधारणेची नोंदणी करून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता तसेच किमान एक प्रसूतीपूर्व तपासणी पूर्ण केल्यानंतर पात्रतेनुसार पहिला हप्ता देण्यात येतो. दुसरा हप्ता २ हजार रुपये देण्यात येतो. बालकाचा जन्म नोंदणी झाल्यानंतर तसेच निर्धारित कालावधीत आवश्यक लसीकरण पूर्ण केल्यानंतर पात्रतेनुसार दुसरा हप्ता देण्यात येतो.

तसेच, दुसरे अपत्य मुलगी असल्यास, बालकाच्या जन्म नोंदणीनंतर व निर्धारित लसीकरणाची पूर्तता झाल्यानंतर पात्र लाभार्थीस ६ हजार रुपये एकरकमी आर्थिक लाभ देण्यात येतो.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी  पात्र गर्भवती महिलेने आपल्या जवळच्या अंगणवाडी केंद्रात किंवा उप-आरोग्य केंद्रात गर्भधारणेची नोंदणी करावी. बँक खात्याची खात्री करणे आवश्यक असून, लाभार्थीचे स्वतःचे बँक खाते उपलब्ध असून ते डीबीटीसाठी कार्यरत आहे व एनपीसीआयशी जोडलेले आहे, याची खात्री करावी.

तसेच, लाभार्थी महिलेचे माता व बाल संरक्षण कार्ड,  आधार कार्ड, पात्रतेनुसार आवश्यक कागदपत्रांपैकी कोणतेही एक कागदपत्र असणे आवश्यक आहे. बँक खाते तपशील / डीबीटीसाठी आवश्यक माहिती तसेच  पात्रतेनुसार इतर आवश्यक कागदपत्रे, पात्रतेनुसार उपलब्ध कागदपत्रे यामध्ये अनुसूचित जाती (SC) / अनुसूचित जमाती (ST) प्रमाणपत्र, आर्थिक (EWS) किंवा पूर्णपणे अपंगत्व प्रमाणपत्र, बीपीएल रेशन कार्ड, आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना कार्ड, ई-श्रम कार्ड, किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी ओळखपत्र, मनरेगा जॉब कार्ड, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाख रुपयापेक्षा कमी असल्यास उत्पन्नाचा दाखला सादर करणे आवश्यक आहे.

 गर्भवती / स्तनपान करणारी महिला अंगणवाडी सेविका, अंगणवाडी सहाय्यक किंवा आशा कार्यकर्ती असल्यास संबंधित पुरावा किंवा भारत सरकारने अधिसूचित केलेल्या इतर कोणत्याही श्रेणी / दस्तऐवजांपैकी लागू असलेले कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये मुंबई शहर जिल्ह्यात ५,५५६ लाभार्थींना २ कोटी १० लाख ८७ हजार रुपये इतका लाभ वितरित करण्यात आला.  मुंबई शहर जिल्ह्यात २०२६-२७ मध्ये आतापर्यंत ४,६७६ लाभार्थी नोंदविण्यात आले आहेत.

मुंबई उपनगर जिल्ह्यात आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये ७,९३४ लाभार्थींना २ कोटी ९० लाख ३६ हजार रुपये इतका आर्थिक लाभ देण्यात आला. २०२६-२७ मध्ये आतापर्यंत १६,७०८ लाभार्थी नोंदविण्यात आले आहेत. जवळच्या अंगणवाडी सेविकेशी संपर्क साधून प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेत नोंदणी करून पात्र महिलांना या योजनेचा लाभ घेता येतो.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages