राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात 'सद्भावना दिवस' प्रतिज्ञा - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, August 21, 2026

राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात 'सद्भावना दिवस' प्रतिज्ञा

 


 

          अमरावती, दि. २१ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क):  भारताचे दिवंगत पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या जयंती  निमित्त जिल्ह्याधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस अतिरिक्त जिल्हाधिकारी गोविंद दानेज यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना ‘सद्‌भावना दिवस’ प्रतिज्ञा दिली.



 

         जात, वंश, धर्म, प्रदेश किंवा भाषा विषयक भेद न करता भावनिक ऐक्य आणि सामंजस्य यासाठी काम करण्याची तसेच सर्व प्रकारचे मतभेद हे हिंसाचाराचा अवलंब न करता संविधानिक मार्गानी सोडविण्याची प्रतिज्ञा उपस्थितांना दिली. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे, अधिक्षक निलेश खटके, विधी अधिकारी नरेंद्र बोहरा आदि अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.  

                                                                

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages