दिवंगत नाना उर्फ एकनाथ हिरुडकर यांच्या जयंतीनिमित्त स्मरण बैठकीत विचारांना उजाळा - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, August 6, 2026

दिवंगत नाना उर्फ एकनाथ हिरुडकर यांच्या जयंतीनिमित्त स्मरण बैठकीत विचारांना उजाळा



अमरावती, दि. ७ ऑगस्ट २०२६ : ज्येष्ठ सर्वोदयी दिवंगत नाना उर्फ एकनाथ हिरुडकर
यांच्या जयंतीनिमित्त दि.५ जयराम नगर, शंकर नगर रोड, अमरावती येथे स्मरण बैठकीचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात त्यांच्या सामाजिक कार्याचा, सर्वोदय विचारांचा तसेच समाजपरिवर्तनासाठी दिलेल्या योगदानाचा गौरवपूर्वक स्मरण करण्यात आले.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सर्वोदयी धर्मेंद्रसिंह राजपूत हे होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात दिवंगत एकनाथ हिरुडकर यांच्या साधेपणा, सेवाभाव आणि समाजहिताच्या कार्याचा आदर्श पुढील पिढीने जपण्याचे आवाहन केले. तसेच नाना च्या बहीण तारा हिरुळकर यांची उपस्थिती होती त्यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे आयोजन प्रतिभा चव्हाण (राठोड) – हर्षा सगणे यांनी केले होते. अमरावतीतील प्रगती, प्रफुल्ल मंदा श्रीधर, विजय डवरे कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, नागरिक व सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी दिवंगत एकनाथ हिरुडकर यांच्या प्रतिमेस सुताचा हार अर्पण करून अभिवादन केले तसेच त्यांच्या स्मृतींना उजाळा देत समाजसेवेचा व मानवतेचा संदेश पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages