अमरावतीत ९ ऑगस्टला होणार गुरुकृपा वर्षायोग-२०२६ चा चातुर्मास मंगल कलश स्थापना महोत्सव



मुनिश्री १०८ निराकारसागर जी, निर्माणसागर जी आणि उत्साहसागर जी मुनिराज ससंघाच्या पावन उपस्थितीत होणार आयोजन
दि. ७ अमरावती: महाराष्ट्राची धर्मनगरी अमरावती येथे गुरुकृपा वर्षायोग-२०२६ अंतर्गत चातुर्मास मंगल कलश स्थापना महोत्सवाचे भव्य आयोजन रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी केले जाईल. या प्रसंगी परम पूज्य संत शिरोमणि आचार्य गुरुदेव श्री १०८ विद्यासागर जी मुनिराज यांचे परम शिष्य आणि विद्याशिरोमणि आचार्य गुरुदेव श्री १०८ समयसागर जी मुनिराज यांच्या आज्ञानुवर्ती मुनिश्री १०८ निराकारसागर जी मुनिराज, मुनिश्री १०८ निर्माणसागर जी मुनिराज तसेच मुनिश्री १०८ उत्साहसागर जी मुनिराज ससंघाच्या पावन उपस्थितीत हा धार्मिक सोहळा संपन्न होणार आहे.
समितीने सांगितले की, चातुर्मास कलश स्थापना महोत्सव हा जैन समाजाचा अत्यंत महत्त्वाचा धार्मिक उत्सव आहे. यामध्ये मोठ्या संख्येने भाविक सहभागी होऊन धर्मलाभ घेतील. आयोजन समितीने सर्व गुरुभक्तांना जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून पुण्य पदरात पाडून घेण्याचे आवाहन केले आहे.
घरी बसून कलश बुकिंगची सुविधा
गुरुकृपा वर्षायोग समितीने भाविकांसाठी विशेष सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. इच्छुक भाविक घरी बसूनच चातुर्मास कलशाचे बुकिंग करू शकतात. समितीचे म्हणणे आहे की, जे श्रावक आपल्या घरात पूज्य गुरुदेवांच्या चातुर्मास कलशाची स्थापना करतात, त्यांना सुख, शांती आणि ऐश्वर्याची प्राप्ती होते. यासाठी समितीने संपर्क क्रमांक जारी केले आहेत.
यांच्याशी साधता येईल संपर्क
कलश बुकिंग आणि आयोजनाबाबतच्या माहितीसाठी मुकेश जैन (अध्यक्ष) - 9326689900, शैलेंद्र जैन- 8421434848, किशोर नखाते - 7276239837, योगेश विटाळकर - 9372414340, रूपेश राउळ - 9423426137, प्रदीप आग्रेकर - 9822736170, प्रमोद बगत्रे - 9423279020, संजय कान्हेड - 9421819032, राजेंद्र शाह - 8149284333, भावेश जैन - 9309555984, विवेक फुलंबरकर- 9579799966 तसेच नरेश येलवणकर - 9421513136 यांच्याशी संपर्क साधता येईल.
हे आयोजन गुरुकृपा वर्षायोग समिती आणि श्री सकल दिगंबर जैन समाज, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने केले जात आहे.

Post a Comment

0 Comments