महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या स्थापना दिनानिमित्त विशेष परिसंवादास उपस्थित राहण्याचे आवाहन - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, August 6, 2026

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या स्थापना दिनानिमित्त विशेष परिसंवादास उपस्थित राहण्याचे आवाहन



अमरावती, दि. ७ ऑगस्ट : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ९ ऑगस्ट स्थापना दिनानिमित्त महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, अमरावती व गुरुदेव सेवाश्रम ट्रस्ट, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने "राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत विचार" या विषयावर विशेष परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम रविवार, दि. ९ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १२.३० ते ३.३० या वेळेत गुरुदेव सेवाश्रम ट्रस्ट, राधानगर, अमरावती येथे होणार आहे.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. सतीश तराळ (ज्येष्ठ साहित्यिक तथा अध्यक्ष, गुरुदेव सेवाश्रम ट्रस्ट, उपाध्यक्ष महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, अमरावती) हे राहतील.
परिसंवादात डॉ. शोभा गायकवाड, प्राचार्य अनिल प्रांजळे, डॉ. श्रीधरराव जावरकर तसेच मा. गजेन्द्र सुरकार हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
वैज्ञानिक दृष्टिकोन, विवेकवाद आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाजप्रबोधनात्मक विचारांचा जागर करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या परिसंवादास सर्व नागरिक, विद्यार्थी, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते, साहित्यप्रेमी व विवेकवादी विचारांचे समर्थक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्रफुल्ल मंदा श्रीधर, विजय डवरे, सचिन खोब्रागडे, मंजू वासानिक, दिलीप लाडे,नरेंद्र धर्माळे, आशिष देशमुख,पल्लवी ढोले, सौरभ देशमुख, संदीप हिवराळे, राहुल खंडारे लक्ष्मण तडस,विजया करोले, बबिता वानखडे मो. अफसर भाई व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, अमरावती व गुरुदेव सेवाश्रम ट्रस्ट,अमरावती च्या सर्व पदाधिकारी व साथी यांच्या वतीने करण्यात आले आहे. 

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages