'रानभाजी महोत्सवा'चे आज आयोजन - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, August 13, 2026

'रानभाजी महोत्सवा'चे आज आयोजन

नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन


अमरावती, दि. १३ ( ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): मानवी आरोग्यामध्ये रानभाज्यांचे असलेले महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी कृषी विभागाच्या वतीने 13 ऑगस्ट रोजी बळीराजा सभागृह, कृषी संकुल, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, विद्यापीठ रोड येथे रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

       रानभाज्या जंगलात आणि शेताच्या बांधावर नैसर्गिकरित्या उगवतात. रानपालेभाज्या, फळभाज्या आणि कंदभाज्यांमध्ये भरपूर पौष्टिक घटक असतात.या भाज्यांवर कोणत्याही रासायनिक कीटकनाशकांची किंवा बुरशीनाशकांची फवारणी केली जात नाही.

     या महोत्सवात रानभाज्यांची वैशिष्ट्ये, त्यांचे संवर्धन आणि विविध पाककृतींची (रेसिपी) सचित्र माहिती दिली जाणार आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांना रानभाज्यांच्या आरोग्यदायी फायद्यांची माहिती देणे आणि रानभाज्यांसाठी थेट विक्री व्यवस्था (मार्केट चेन) निर्माण करून शेतकऱ्यांना आर्थिक नफा मिळवून देणे हा या महोत्सव आयोजनामागील उद्देश असल्याचे तालुका कृषी अधिकारी प्रशांत गुल्हाने यांनी सांगितले आहे.

      सन 2020-21 पासून दरवर्षी 9 ते 15 ऑगस्ट या कालावधीत हा रानभाजी महोत्सव साजरा केला जातो. याही वर्षी अमरावती तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या महोत्सवाला भेट द्यावी, असे आवाहन  करण्यात आले आहे.



--

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages