सेंट्रल बँक ऑफ इंडिया तर्फे 17 ऑगस्ट रोजी प्रथोट येथे ‘कृषी कर्ज वितरण शिबीरा’ चे आयोजन - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, August 13, 2026

सेंट्रल बँक ऑफ इंडिया तर्फे 17 ऑगस्ट रोजी प्रथोट येथे ‘कृषी कर्ज वितरण शिबीरा’ चे आयोजन


 

अमरावती, दि.१४ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी बँकिंग सुविधा त्यांच्या दारी पोहचविण्याच्या उद्देशाने सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्यावतीने 17 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 2.00 वाजता अचलपूर तालुक्यातील पथ्रोट येथील प्रसन्न लॉन येथे आयोजित करण्यात आला आहे.

 

शेतकरी व ग्रामीण भागातील नागरिकांना विविध कृषी कर्ज योजना, बँकिंग सुविधा तसेच केंद्र व राज्य शासनाच्या कृषीविषयक योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या उद्देशाने बँकच्या राष्ट्रव्यापी मेगा कृषि आउटरीच कॅम्पचा हा भाग आहे. या एकदिवशीय  शिबीरामध्ये शेतकऱ्यांना पीक कर्ज, कृषी मुदत कर्ज, कृषी यांत्रिकीकरण, सिंचन, पशुपालन, दुग्ध व्यवसाय, मत्स्य व्यवसाय, कृषीपूरक व्यवसाय तसेच इतर कृषी व ग्रामीण कर्ज योजनांबाबत बँकेच्या   मुंबई येथील केंद्रीय कार्यालय मुंबई  उप महाप्रबंधक पुरुषोत्तम मीणा अमरावतीचे क्षेत्रीय प्रबंधक सुनील पाण्डेय मार्गदर्शन करणार आहेत.

 

या शिबिरात पात्र शेतकऱ्यांकडून कर्ज प्रस्ताव स्वीकारले जातील आणि  प्रलंबित कर्ज प्रकरणांचा आढावा घेण्यात येईल  तसेच विविध बँकिंग व डिजिटल बँकिंग सुविधांची माहिती देण्यात येणार आहे.याशिवाय शेतकऱ्यांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देऊन त्यांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन करण्यात येणार आहे. शेतकरी, कृषी उद्योजक, महिला बचत गट, एफपीओ तसेच ग्रामीण भागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या शिबिरात सहभागी होऊन उपलब्ध सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन सेंट्रल बँक ऑफ इंडिया चे अग्रणी जिल्हा व्यवस्थापक नरेश हेड़ाऊ यांनी आले आहे.


 

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages