स्वातंत्र्यदिनी 'महा रक्तदान शिबिराचे' आयोजन - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, August 14, 2026

स्वातंत्र्यदिनी 'महा रक्तदान शिबिराचे' आयोजन


 

                                                            'रक्तदान - शहिदों के नाम' 


अमरावती, दि. १४ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : महा रक्तदान शिबिराचे आयोजन शनिवार, दि. १५ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता हॉटेल ग्रँड महफिल येथील रुबी हॉल येथे करण्यात आले आहे. राज्य उत्पादन शुल्क आणि अमरावती जिल्हा मद्य विक्रेता संघटना यांच्या वतीने हे शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

 

'रक्तदान - शहिदों के नाम' अशी संकल्पना या शिबिराची ठेवण्यात आली आहे. या शिबिराचे आयोजन राज्य उत्पादन शुल्कचे विभागीय उपायुक्त डॉ. पराग नवलकर, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक शशिकांत गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. तसेच, महा रक्तदान शिबीर आयोजन समितीचे अध्यक्ष नितीन देशमुख, उपाध्यक्ष अनिल भामोरे, दीपक गुडधे, विजय जयस्वाल, सुरेश चांदवानी, बाबूसेठ मतानी आणि इतर सर्व पदाधिकारी व सदस्यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे.

 

स्वातंत्र्य दिनी रक्तदान करून आरोग्य यज्ञात सहभागी व्हावे, तसेच राष्ट्रसेवा आणि मानवसेवेचे कार्य करावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


--

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages