अमरावती, दि.२३ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे गुरुवार, दि. 23 जुलै रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.
दौऱ्यानुसार, श्री. बावनकुळे सकाळी 10.30 वाजता तिवसा तहसील कार्यालयात आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियानास उपस्थित राहतील. दुपारी 12 वाजता अमरावती येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथील छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान शिबीराचे उद्घाटन करतील. हे शिबीर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आणि माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आले आहे. दुपारी 3 चिखलदरा येथील पोलीस स्टेशनच्या कवायत मैदानावर आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर आणि मुख्यमंत्री जनआरोग्य अभियानांतर्गत मेळघाटातील बालकांमधील जन्मजात हृदयरोगावर मोफत उपचारासाठी आयोजित 'प्रोजेक्ट डीईव्हीए' कार्यक्रमास उपस्थित राहतील. त्यानंतर सोयीने नागपूरकडे प्रयाण करतील.
0