ग्रामोद्योग भरारी पुरस्कारासाठी नामांकने सादर करण्याचे आवाहन - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, July 23, 2026

ग्रामोद्योग भरारी पुरस्कारासाठी नामांकने सादर करण्याचे आवाहन



अमरावती, दि. २३ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): खादी व ग्रामद्योग मंडळाच्या वतीने ग्रामोद्योग भरारी पुरस्कार 2026 साठी नामांकने मागविण्यात आली आहे. यशस्वी उद्योजकांनी नामांकने सादर करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

शासकीय योजनांच्या माध्यमातून विशेषत: ग्रामीण भागातील उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाने सन 2023 पासून हा पुरस्कार सुरू केला आहे. यंदा या पुरस्काराचे चौथे वर्ष आहे. पुरस्कार योजनेत प्रथम, द्वितीय आणि तृतीय असे तीन पुरस्कार देण्यात येणार असून काही उद्योजकांना उत्तेजनार्थ पुरस्कार दिला जाणार आहे.

नामांकन अर्ज मंडळाच्या mskvib.org या संकेतस्थळ, तसेच खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या जिल्हा कार्यालयात उपलब्ध आहेत. इच्छुकांनी आपले नामांकन अर्ज दि. 28 जुलै 2026 पुर्वी जिल्हा कार्यालयात सादर करावेत. तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, अमरावती यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages