शुक्रवारी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांचा दौरा - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Wednesday, July 1, 2026

शुक्रवारी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांचा दौरा

 

 राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर 

अमरावती, दि. १ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क ) : राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर या शुक्रवार, दि. 3 जुलै रोजी जिल्ह्याच्या दौऱ्‍यावर येत आहेत. दौऱ्या दरम्यान त्या कार्यशाळा, जनसुनावणी आणि आढावा बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

श्रीमती रहाटकर ह्या शुक्रवारी सकाळी 10 ते 11 वाजेपर्यत जिल्हा नियोजन भवन येथे पोश अॅक्ट अधिनियम 2013 या विषयावरील कार्यशाळेला उपस्थित राहतील. सकाळी 11 ते 12 वाजेपर्यत अमरावती येथील श्री शिवाजी सायन्स कॉलेज येथे यशोदा एआयबाबत कार्यशाळात सहभागी होतील. दुपारी 12 ते 1.30 या वेळेत जिल्ह्यातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी यांच्या सोबत विविध विषयावर आढावा बैठक घेतील. दुपारी 1.30 ते 2.30 वाजेपपर्यत जिल्हा नियोजन भवन येथे महिलाच्या तक्रारीबाबत जन सुनावणीला उपस्थित राहतील. यात कौटुंबिक हिंसाचार, लैगिक छळ अनैतिक व्यापार, महिलांचे अपहरण, आदी महिलांच्या सुरक्षिततेच्या विषयाबाबत महिलांच्या समस्या व तक्रारी स्विकारण्यात येतील. त्यानंतर दुपारी 3 ते 4.30 या वेळेत जिल्ह्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्‍यांसोबत महिलांच्या सुरक्षितता, संरक्षण तसेच महिला आणि महिला सक्षमीकरणाशी संबंधित विविध विषयावर आढावा बैठक घेण्यात येणार आहे. शासकीय विश्रामगृह येथे सायंकाळी 5 ते 6 दरम्यान जिल्ह्यातील लोकसभा सदस्य, विधानसभा सदस्य, विधान परिषद सदस्य यांच्यासोबत महिलांच्या विविध समस्यावर बैठक घेतील.

या कार्यक्रमाला नागरीकांनी उपस्थित राहावे, तसेच समस्यांचे निराकरण करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी केले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages