विधी जनजागृती, कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Wednesday, July 29, 2026

विधी जनजागृती, कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर


 

 

अमरावती, दि. ३० : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयात मंगळवार, दि. २८ जुलै रोजी 'विधी जनजागृती आणि कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर' उत्साहात पार पडले. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव संजय सहारे, प्राचार्य डॉ. वर्षा देशमुख, प्रा. डॉ. नंदकिशोर के. रामटेके उपस्थित होते.


 

न्यायरक्षक कार्यालयाचे सहायक अधिवक्ता अॅड. श्री अंकुश इंगळे यांनी नाल्सा योजनेंतर्गत जागरूकता, शिक्षण, प्रतिबंध आणि पुनर्वसन उपायांवर मार्गदर्शन केले. श्री. सहारे यांनी पर्यायी वाद निवारण पद्धती, त्याचे फायदे आणि नागरिकांची मूलभूत कर्तव्ये याबाबत मार्गदर्शन केले. डॉ. देशमुख यांनी कायदेविषयक जनजागृतीचे महत्त्व स्पष्ट केले.

 

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या पॅनल अधिवक्ता अॅड. सपना काळे-विधळे यांनी सूत्रसंचालन केले. विधी स्वयंसेवक अमोल पोकळे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला श्री. मालवीय, प्रा. लोखंडे आदी उपस्थित होते.

 


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages