29 आणि 30 जुलै रोजी कामगार विभागाची सरळसेवा परीक्षा - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Wednesday, July 29, 2026

29 आणि 30 जुलै रोजी कामगार विभागाची सरळसेवा परीक्षा



* उमेदवारांना सतर्कतेचे आवाहन

 

अमरावती, दि. ३० : कामगार विभागाअंतर्गत माथाडी व सुरक्षा रक्षक मंडळातील निरीक्षक, लेखापाल आणि लघुटंकलेखक या पदांसाठीची सरळसेवा परीक्षा गट-क २०२६ दि. 29 आणि 30 जुलै रोजी आयोजित करण्यात आली आहे. ही संपूर्ण परीक्षा ऑनलाइन पद्धतीने पार पडणार आहे. परीक्षेच्या निमित्ताने उमेदवारांना सतर्कता बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

ही परीक्षा मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक, नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड या ८ जिल्ह्यांमधील 22 केंद्रांवर घेतली जाणार आहे. सुरळीत आणि पारदर्शक परीक्षेसाठी संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस प्रशासन व इतर सर्व शासकीय यंत्रणांना सतर्कतेचा इशारा दिला आहेत. परीक्षा केंद्रांच्या परिसरात कडक सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. ही ऑनलाइन परीक्षा टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमीटेडमार्फत पारदर्शकपणे पार पडणार आहे.

 

परीक्षेदरम्यान कोणताही गैरप्रकार आढळल्यास किंवा कोणीही व्यक्ती, संस्था गैरमार्ग, अमिष दाखवण्याचा प्रयत्न करीत असल्यास, अशा कोणत्याही गैरप्रकाराला उमेदवारांनी बळी पडू नये. तसेच कोणताही अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास उमेदवारांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन कामगार उपायुक्त चं. अं. राऊत यांनी केले आहे.

 



Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages