सहकार व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरू; - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Wednesday, July 1, 2026

सहकार व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरू;


सहकारी संस्थांमधील कर्मचाऱ्यांना 'डीसीएम' अनिवार्य

अमरावती दि १ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): महाराष्ट्र शासनाच्या सहकार विभागाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार सहकारी संस्थांमध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी 'सहकार व्यवस्थापन पदविका' (DCM) अभ्यासक्रम पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर, राज्यातील सहकारी संस्थांमधील कर्मचाऱ्यांना आपले दैनंदिन कामकाज सांभाळून हा अभ्यासक्रम पूर्ण करता यावा, तसेच सुशिक्षित बेरोजगार तरुणांना सहकार क्षेत्रात रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने महाराष्ट्र राज्य सहकारी संघातर्फे दुरस्थ (पोस्टल) शिक्षण पद्धतीने हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे.

 महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्यादित (पुणे) अंतर्गत अमरावती येथील 'भाऊसाहेब भोकरे सहकार प्रशिक्षण केंद्र' येथे या सहा महिन्यांच्या पदविका अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया अधिकृतपणे सुरू झाली आहे. हा अभ्यासक्रम 1 जुलै 2026 ते 31 डिसेंबर 2026 या कालावधीसाठी असणार असून, यामध्ये प्रवेश घेण्याची मुदत 1 जुलै 2026 ते 30 जुलै 2026 पर्यंत निश्चित करण्यात आली आहे. या अभ्यासक्रमासाठी सहकारी संस्थांचे प्रतिनिधी किंवा कर्मचाऱ्यांसाठी किमान 10 वी उत्तीर्ण आणि संबंधित संस्थेतील 6 महिन्यांचा कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे, तर खाजगी किंवा थेट उमेदवारांसाठी किमान 12 वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. सहकार क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी किंवा या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या पात्र उमेदवारांनी वेळेत आपले प्रवेश निश्चित करावेत, असे आवाहन प्रशिक्षण केंद्रातर्फे करण्यात आले आहे. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशा संदर्भातील अधिक माहिती, प्रवेश अर्ज आणि नाव नोंदणीसाठी उमेदवारांनी प्राचार्य, भाऊसाहेब भोकरे सहकार प्रशिक्षण केंद्र, अमरावती यांच्याशी थेट संपर्क साधावा, ज्यासाठी अधिकृत संपर्काकरिता 9881047668 हा भ्रमणध्वनी क्रमांक जाहीर करण्यात आला आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages