अमरावती, दि. १ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : अमरावती शहरातील बडनेरा-अमरावती राज्य मार्ग क्र. 304 वरील कि. मी. 162/050 या पादचारी उड्डाणपूलाचे विकासकाम सर्वसामान्य नागरिकांचे हिताचे असून सदर स्टिल स्ट्रक्चर निश्चित स्थानावर स्थापीत करतांना कोणताही अनुचित प्रकार घडु नये याकरीता अलामस गेट बडनेरा ते सावता मैदान बडनेरा या दरम्यान मार्गावरील वाहतुक बंद ठेवण्यात येत असल्याची माहिती अमरावती शहर वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त रमेश धुमाळ यांनी दिली आहे.
हे मार्ग बंद असतील
अलमास गेट ते सावता मैदान बडनेरा पर्यंत मार्ग सर्व प्रकारचे वाहन व पादचारी यांना कालावधी 4 जुलै च्या रात्री 11.30 वाजेपासून दि. 5 जुलै 2026 च्या सकाळी 6 वाजेपर्यंत बंद राहील.
हे असतील पर्यायी मार्ग
बडनेरा कडून अलमास गेट कडे येणार सर्व वाहनांनी अकोला वाय पॉइंट येथून सुपर एक्सप्रेस हायवेवर मेघे कॉलेज चौक, कोंडेश्वर टी पॉईटं मार्गे अमरावती. अमरावती कडून अलमास गेट मार्गे बडनेरा कडे जाणाऱ्या वाहनांनी जुना बायपासचा वापर करावा.
सदर अधिसुचनेचे जो कोणी वाहन चालक उल्लंघन करेल त्यांचे विरूध्द मो. वा. का. 1988 व महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 अन्वये कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. असे आवाहन अमरावती शहरचे पोलीस उपायुक्त रमेश धुमाळ यांनी केले आहे.