ग्रामीण पोलीस दलात 11 महिन्यांच्या प्रशिक्षणाची संधी देण्यात आली. - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Wednesday, July 1, 2026

ग्रामीण पोलीस दलात 11 महिन्यांच्या प्रशिक्षणाची संधी देण्यात आली.



मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी रोजगार मेळावा संपन्न 

अमरावती, दि. १ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): नोकरीच्या शोधात असलेल्या सुशिक्षित तरुण-तरुणींना आपले कौशल्य वाढवण्याची आणि शासकीय विभागात कामाचा अनुभव घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि पोलीस अधीक्षक (ग्रामीण) कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने काल  30 जून 2026 रोजी 'मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी रोजगार मेळाव्याचे' आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून अमरावती ग्रामीण पोलीस विभागाच्या आस्थापनेअंतर्गत 11 महिन्यांच्या कार्य प्रशिक्षणासाठी पात्र उमेदवारांची निवड प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे केली आहे.

हा मेळावा डेपो रोडवरील शासकीय तांत्रिक विद्यालय परिसरातील जिल्हा कौशल्य विकास केंद्रात आयोजित करण्यात आला .यासाठी वय किमान 18 ते 35 वर्षे आणि शैक्षणिक पात्रता 12 वी पास, आयटीआय, पदविका, पदवीधर किंवा पदव्युत्तर उत्तीर्ण असणे आवश्यक होते. सध्या शिक्षण सुरू असलेले उमेदवार यासाठी पात्र नसतील. इच्छुक उमेदवारांनी 'cmykpy' संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी तसेच बँक खाते आधार संलग्न असणे अनिवार्य आहे. अधिक माहितीसाठी 0721-2566066 या क्रमांकावर संपर्क साधावा. जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेतला , असे आवाहन सहायक आयुक्त यांनी केले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages