राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा अमरावतीत शुभारंभ; - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Tuesday, June 30, 2026

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा अमरावतीत शुभारंभ;








30 जूनपासून 5 दिवस चालणार घरोघरी मोहीम

अमरावती, दि. १ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): जिल्हा सामान्य रुग्णालय, अमरावती येथे राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा नुकताच शुभारंभ करण्यात आला आहे. अकोला परिमंडळाचे आरोग्य सेवा उपसंचालक तथा अमरावती जिल्ह्याचे राज्यस्तरीय समन्वय अधिकारी डॉ. सुशीलकुमार वाकचौरे यांच्या हस्ते बालकाला पोलिओचा डोस पाजून या देशव्यापी मोहिमेची अधिकृत सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विनोद पवार, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप हेडाऊ, अधिसेविका ललिता अटाळकर, जिल्हास्तरीय पर्यवेक्षक अधिकारी यांच्यासह रुग्णालयीन अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय आणि नगरपरिषद कार्यक्षेत्रामध्ये या मोहिमेचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले असून, यासाठी एकूण २२८ लसीकरण बूथ कार्यान्वित करण्यात आले आहेत. दि. 28 जून रोजी बूथ स्तरावर 0 ते 5 वर्ष वयोगटातील बालकांना पोलिओचा डोस देण्यात आला असून, मोहिमेच्या पुढील टप्प्यात दि. 30 जून ते 4 जुलै 2026 या पाच दिवसांच्या कालावधीत विशेष पथकांद्वारे घरोघरी जाऊन उर्वरित सर्व बालकांचा शोध घेतला जाणार आहे. या 5 दिवसांत एकही बालक डोस मिळण्यापासून वंचित राहू नये यासाठी आरोग्य यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली असून, जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आणि पालकांनी आपल्या 0 ते 5 वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला पोलिओचा डोस पाजून आपल्या पाल्याला या गंभीर आजारापासून सुरक्षित करावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विनोद पवार यांनी केले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages