आयआयटी मद्रासकडून जिल्ह्यात 'डीडीएचआय' अंतर्गत रस्ता सुरक्षा प्रशिक्षण संपन्न - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Wednesday, July 1, 2026

आयआयटी मद्रासकडून जिल्ह्यात 'डीडीएचआय' अंतर्गत रस्ता सुरक्षा प्रशिक्षण संपन्न

 

  


            अमरावती, दि.१ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): जिल्ह्यातील रस्ता सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी आणि अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी आयआयटी मद्रासच्या 'सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर रोड सेफ्टी' (CoERS) तर्फे जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने विशेष रस्ता सुरक्षा प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 'डीडीएचआय' (DDHI) उपक्रमांतर्गत हे एकदिवसीय प्रशिक्षण काल नियोजन भवन येथे संपन्न झाले. या प्रशिक्षणासाठी आयआयटी मद्रासचे प्रमुख प्रकल्प अधिकारी डॉ. रोशन जोस आणि प्रकल्प अभियंता प्रदीप कुमार एनव्हीके यांनी प्रशिक्षण दिले.

जिल्हाधिकारी आशिष येरेकर  यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाने या प्रशिक्षणाचे नियोजन करण्यात आले.यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता आर. वाय. पाटील कार्यकारी अभियंता प्रतिक गिरी यासह पोलीस, परिवहन, रस्ते विकास यंत्रणा, आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

 

 या सत्रामध्ये वर्गखोली प्रशिक्षणाद्वारे डीडीएचआय आणि एफपीएस ऍप्लिकेशन्स, रस्त्यावरील धोके ओळखणे, अहवाल यंत्रणा आणि विविध विभागांच्या जबाबदाऱ्या यावर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळवून देण्यासाठी ट्रॉमा केअर आणि आपत्कालीन वैद्यकीय प्रतिसादावर विशेष चर्चा करण्यात आली.

            अमरावतीमधील रस्त्यांचे जाळे अधिक सुरक्षित करण्यासाठी हे प्रशिक्षण अत्यंत महत्त्वाचे पाऊल ठरेल, असा विश्वास जिल्हा प्रशासनाच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.



Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages