शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, June 25, 2026

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू


अमरावती, दि. २६  (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : शासकीय वसतिगहात प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शासकीय वसतिगृह युनिट क्र. 4, जेल रोड, अमरावती, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले गुणवंत मुलींचे शासकीय वसतिगृह, जेल रोड, अमरावती,  क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शासकीय वसतिगृह, कॅम्प, अमरावती, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शासकीय वसतिगृह, अमरावती, 125 जयंती विलासनगर येथे शैक्षणिक सत्र 2026-27 करीता कनिष्ठ महाविद्यालयीन आणि अव्यावसायिक महाविद्यालयीन विभागाकरीता दि. 15 जुलैपर्यंत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू आहे.

प्रवेशाकरीता इच्छुक विद्यार्थ्यांनी hmasnew.mahait.org या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सदर करावेत. ऑनलाईन केलेला अर्ज डाऊनलोड करुन त्याची प्रिंट आणि सोबत आवश्यक कागदपत्रे वसतिगृहास सादर करावीत. वसतिगृहात प्रवेश मिळाला नसल्यास विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेंतर्गत आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे, असे शासकीय वसतिगृहाच्या गृहपाल यांनी कळविले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages